AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! प्रेमात इतकी वेडी झाली तरुणी की, आई-वडील यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला…

प्रेम आंधळे असते असे अनेक जण बोलतात. पण जगात काही घटना अशा घडतात जे हे खरच असल्याचं भासवतात. कारण एका तरुणी प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने धक्कादायक पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण देशाला हादरा बसला. एखादी व्यक्ती आपल्या आई-वडिलांसोबत अशी कशी वागू शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये.

धक्कादायक ! प्रेमात इतकी वेडी झाली तरुणी की, आई-वडील यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला...
| Updated on: Oct 07, 2024 | 9:29 PM
Share

जगात अनेक अशा घटना घडत असतात ज्यामुळे संपूर्ण मानव जातीला काळिमा फासली जाते. पाकिस्तानमध्ये एका मुलीने तिच्या प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिला म्हणून तिने धक्कादायक पाऊल उचललं. ती कुटुंबियांवर इतकी नाराज झाली की तिने तिच्या संपूर्ण कुटुंबीयांना मृत्यूंचा दारात ढकललं. रविवारी, 6 ऑक्टोबर रोजी सिंध प्रांतात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केलीये. या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, कुटुंबीयांनी न स्वीकारल्याने मुलगी खूप संतापली होती. त्यानंतर त्याने ही घटना घडवून आणली.

आरोपी तरुणीने तिच्या प्रियकरासह आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना विष देण्याचा कट रचला होता. तिने अन्नामध्ये विष मिसळले ज्यामुळे जेवन झाल्यानंतर कुटुंबातील सर्व 13 सदस्य आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात नेले. पण सर्वांचा मृत्यू झाला. कुटुंबातील 13 सदस्यांचा विष मिळलेले अन्न खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. खैरपूरजवळील हैबत खान ब्रोही गावात 19 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.

आपल्या पसंतीनुसार लग्न करण्यास तयार नसल्यामुळे तिने कुटुंबातील व्यक्तींचा काटा काढला. तरुणीला अटक करण्यात आली आहे. तरुणीने स्वत:च तिच्या कुटुंबीयांच्या जेवणात विष मिळवल्याचं कबुल केले आहे. एकाच कुटुंबातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी सांगितले की, डॉक्टरांनी मृतांचे शवविच्छेदन केले तेव्हा सर्व लोकांचा मृत्यू विषारी अन्नामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मुलगी आणि तिच्या प्रियकराने जेवणात विष मिसळल्याचे आढळून आले.

पोलिसांनी रविवारी आरोपी तरुणीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी रागावली होती कारण तिने प्रयत्न करूनही तिचे कुटुंब तिच्या पसंतीच्या मुलाशी तिचे लग्न करण्यास तयार नव्हते. यासोबतच तिने असेही सांगितले की, पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने जेवणात विष मिसळल्याची कबुली दिली. पोलीस तरुणीच्या प्रियकराचाही शोध घेत आहेत. ज्याने आपल्या प्रियसीसोबत हे कृत्य केलंय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.