मन सुन्न करणारी घटना! 4 दिवसांत दोन भावांचा एकसारखा मृत्यू, एक कोर्टात पडला अन् दुसरा…
सरोजिनीनगर पोलीस स्टेशन परिसरातील बंथारा येथे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथे 4 दिवसांत दोन भावांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिससावर शोककळा पसरली आहे.

दोन भावांमधील प्नेमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात, मात्र आता दोन भावांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊतील सरोजिनीनगर पोलीस स्टेशन परिसरातील बंथारा येथे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथे 4 दिवसांत दोन भावांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिससावर शोककळा पसरली आहे. या दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला ते जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार आज (शुक्रवार) सकाळी मॉर्निंग वॉकवरून आलेल्या ४५ वर्षीय मोनू सिंगची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचे निधन झाले. तर चार दिवसांपूर्वी मोनूता धाकटा भाऊ अभिषेक सिंग उर्फ पवन याचाही मृत्यू झाला होता. पवन हा हृदयविकाराचा झटका आल्याने कोर्टात पडला आणि त्यात त्याचे निधन झाले. दोन्ही भावांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मोनू सिंगला बसला होता धक्का
दोन्ही भावांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनच्या मृत्यूनंतर मोनू सिंग यांना मोठा धक्का बसला होता. ते आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. माघारी परतल्यानंतर त्यांनी औषध घेतले, मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांचा मृत्यू झाला.
दोन्ही भावांचे एकमेकांवर होते प्रेम
कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार, मोनू हा त्याचा धाकटा भाऊ पवनवर खूप प्रेम करत होता. मोनूने त्याच्या मेडिकल स्टोअरचे नाव पवनच्या नावावर ठेवले होते. पवन सरोजिनी नगर तहसीलमध्ये वकील होता. त्याचे लग्न पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार होते. मात्र ९ जून रोजी अचानक पवनला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.
पवनचा मृत्यू झाल्यानंतर मोनू दु:खी झाला होता. मात्र आता त्याचाही मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे घरात गोंधळ उडाला आहे. घरातील महिला बेशुद्ध पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून दुःख व्यक्त केले जाते आहे.