Video : ‘जानता हूँ मा#%$@*#$ को’ महिलेला शिव्या देणारा श्रीकांत त्यागी कुठेय? मिसेस त्यागीही पोलिसांच्या ताब्यात

Shrikank Tyadi case : श्रीकांत त्यागी हे स्वतःला राजकीय नेते असल्याचं सांगतात. ते भाजपशी संबंधित असल्याचंही सांगितलं जातं.

Video : 'जानता हूँ मा#%$@*#$ को' महिलेला शिव्या देणारा श्रीकांत त्यागी कुठेय? मिसेस त्यागीही पोलिसांच्या ताब्यात
श्रीकांत त्यागी, शिविगाळ करणारा नेताImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 11:04 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर भाजप नेते श्रीकांत त्यागी (Shrikant Tyagi News) यांचा महिलेला शिविगाळ करताना व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडीओनंतर आता भाजप नेते श्रीकांत त्यागी  (Shrikant Tyagi Video) यांच्यावर कारवाई कधी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलेसोबत शिव्या देत बाचाबाची करणाऱ्या श्रीकांत त्यागी यांचा पोलीस शोध घेत आहेत. अजूनही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. मात्र पोलिसांनी आता श्रीकांत त्यागी यांच्या बायकोला ताब्यात घेतलं आहे. श्रीकांत त्यागी हे अटकेच्या भीतीने अज्ञातवासात गेले असून पोलिसांची (UP Police) पथकं त्यांच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहे. ऋषिकेश इथं श्रीकांत त्यागी यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं असून पुढील तपास केला जातोय. श्रीकांत त्यागी यांच्या पत्नीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. दरम्यान, याआधीही श्रीकांत त्यागी यांच्या पत्नीला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा श्रीकांत यांच्या पत्नीला सकाळी सहा वाजता राहत्या फ्लॅटमधून ताब्यात घेतलंय.

श्रीकांत त्यागी यांनी आपला फोन स्वीच ऑफ ठेवलाय. तसंच ऑनलाईन पैसे पाठवणं, खर्च करणं, असे प्रकारही थांबवलेत. त्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत असून पोलिसांकडून काही पथकं त्यागी यांना शोधण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. उत्तराखंड येथील ऋषिकेशन मध्ये श्रीकांत त्यागी यांचं लास्ट लोकेशन दिसून आलंय. त्यानंतर ते गायब आहे. नोएडामधील पोलिसांची आठ पथकं एकूण 3 राज्यात श्रीकांत त्यागी यांचा शोध घेतेय.

हे सुद्धा वाचा

सोमवारी पाडकाम!

दरम्यान, सोमवारी श्रीकांत त्यागी यांच्या राहत्या सोसायटीमधील अवैध बांधकामावर प्रशासनाने जेसीबी फिरवला होता. शिवाय दुसरीकडे भंगेलमध्ये त्यांच्या इतर दुकानांवरही जीएसटी टीमने छापेमावरी केली. पण त्यानंतर महिलेला शिविगाळ करणारे श्रीकांत त्यागी हे फरार असून त्यांचा शोध घेतला जातोय.

काय प्रकरण?

श्रीकांत त्यागी हे स्वतःला राजकीय नेते असल्याचं सांगतात. ते भाजपशी संबंधित असल्याचंही सांगितलं जातं. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. 5 ऑगस्टला समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते एका महिलेला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करताना दिसले. अवैध बांधकामावरुन जाब विचारणाऱ्या या महिलेशी अरेरावी करत बाचाबाची करणाऱ्या श्रीकांत त्यागी यांच्याविरोधात सोशल मीडियावरुन संतापाची लाट उसळली. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्या सोसायटीतील अवैध बांधकामावरही हातोडा टाकण्यात आला होता. हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या नोएडामधील सेक्टर 93 मध्ये असलेल्या ग्रॅन्ड ओमॅक्स सोसायटीत घडला.

व्हायरल व्हिडीओ नंबर 01 : महिलेला शिविगाळ

व्हायरल व्हिडीओ नंबर 02 : शिविगाळ करत धमकी

व्हिडीओ नंबर 03 : अवैध बांधकामावर कारवाई

सध्या पोलिसांसमोर श्रीकांत त्यागी यांना पकडण्याचं आव्हान उभ ठाकलं आहे. पोलिसांकडून श्रीकांत त्यागीचा कसून शोध घेतला जातो आहे. त्याला पोलीस केव्हा ताब्यात घेतात, याकडे सगळ्यांचीच नजर लागली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.