Maharashtra Election News LIVE : महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या विभागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.

LIVE NEWS & UPDATES
-
बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात
बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात झाली असून न्यायालय परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींवर आज दोष निश्चिती होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ॲड. बाळासाहेब कोल्हे उपस्थित असून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही उपस्थित आहे. VC द्वारे सर्व आरोपी हजर आहेत.
-
दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाला पुण्यात जोरदार हालचाली चालू झाल्या असून दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत.
दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांची बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या जागांवर चर्चा तसेच इतर मुद्दे बैठकीत मांडले जातील.
-
-
वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुती जागा वाटपाचा तिडा कायम
आज सलग दुसऱ्या दिवशी ही भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात प्रमुखांची बैठक होणार आहे. काल पासून बैठकांचे सत्र सुरू मात्र काही जागांवर तोडगा निघत नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, आमदार विलास तरे यांच्यात आज सकाळी ११ वाजता आज दुसऱ्या दिवशी पुन्हा होणार बैठक आहे.
-
प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत
प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत आहेत. प्रशांत जगताप यांचा पक्षासमोर प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार… अशी जगताप यांची भूमिका आहे. प्रशांत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार आहे.
-
राज्यभरातील निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक मुंबईत दाखल
आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दुपारनंतर सर्व नगराध्यक्ष एकनाथ शिंदेंसोबत वंदन करणार. यानंतर दादरच्या वीर सावरकर स्मारक सभागृहात त्यांचा सत्कार होणार आहे.
-
-
ठाकरे बंधूंची युती आहेच, फक्त घोषणा बाकी आहे – संजय राऊत
ठाकरे बंधूंची युती आहेच, फक्त घोषणा बाकी आहे… जागावाटपात आमच्यात कुठेही रस्सीखेच नाही… काल रात्री जागावाटप पूर्ण झालंय… दोन्ही पक्षनेते जागांचा फॉर्म्युला सांगतील… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग
दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर. काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील नेते यांनी केली चर्चा. महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी मधील नेते सकारात्मक
-
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रे हिचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार
मोहोळच्या 22 वर्षीय तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रे हिचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार. मोहोळ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारत नगराध्यक्षपदी विजय मिळवला
-
भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बसले आमरण उपोषणाला
भोकरदन तालुक्यात रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी गाय गोठे वृक्ष लागवड आणि सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला आहे मात्र ही कामे सुरू असून सुद्धा पंचायत समिती प्रशासनाकडून मस्टर काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत शेतकरी पुत्रांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान मागील आठवड्यात याच शेतकरी पुत्रांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कडाक्याच्या थंडीत उपोषण केलं.
-
शेतकऱ्याची किडनी काढण्यावरून मोठी खळबळ
किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवल्याची आणि त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची दिली होती तक्रार.
-
अजित पवारांच्या प्रस्तावासाठी काँग्रेस वेटिंगवर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अद्याप आघाडी संदर्भात कुठलाही कुठला प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला प्रस्ताव न आल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार.
-
बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार
11 वीच्या विद्यार्थ्याला स्टम्पने चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये घुसून जबरी मारहाण केलीय. प्रसिक बनसोडे असे पिडीत विद्यार्थ्याचे नाव असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तब्बल तीन तास मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्याचा आरोप. रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने केली मारहाण. दारूच्या नशेत मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांचा आरोप. दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालयाकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.
-
पुणे- दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग
पुणे- दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील नेते यांनी चर्चा केली.
-
काँग्रेसचा प्लॅन बी तयार, अजित पवारांच्या प्रस्तावासाठी काँग्रेस वेटिंगवर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अद्याप आघाडी संदर्भात कुठलाही कुठला प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला प्रस्ताव न आल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याची काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम
आज पासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असली तरी अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम आहे. काल शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या घरी युतीसाठी चौथी बैठक झाली पण, ही बैठक ही निष्फळ ठरली.
-
नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का
नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का बसला आहे. युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपात प्रवेश केला. बबलू शेलार हे शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आहेत.गजानन शेलार मात्र या प्रवेशा बाबत बोलण्यास तयार नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. मात्र, प्रमुख पक्षांच्या युती किंवा आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने पहिल्या दिवशी या पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता धूसर आहे. नगरपालिकेत स्वबळ आजमावल्यानंतर महानगर-पालिकांमध्ये युतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत, तर मनसेशी जागावाटपाची चर्चा करत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने आता काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी दिल्लीशी संपर्क साधला आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निकालांचे पडसाद महानगरपालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तविली जाते. भाजप आणि महायुतीने विजय संपादन केल्याने त्याचा शहरांमध्ये नक्कीच मतदारांवर प्रभाव पडू शकतो. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 23,2025 8:36 AM
