AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकरांची आत्महत्या, सोलापूर हादरलं

त्यांच्या आत्महचत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही, पण पोलिस सूत्रांच्या सांगण्यानुसार डॉ. वळसंगकर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. डॉक्टरांच्या अकस्मात मृत्यूमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकरांची आत्महत्या, सोलापूर हादरलं
| Updated on: Apr 19, 2025 | 10:38 AM
Share

सोलापूरमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. रात्री 8.30 च्या सुमारास राहत्या घरात त्यांनी रिव्हॉल्वरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून घरातील लोकांनी तातडीने धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी हलवलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉ. वळसंगकर यांचा जीव वाचवता आला नाही. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या घटनेनं सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

हजोर रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान देणाऱ्या डॉ. वळसंगकरांनी आत्महत्येसारखं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि सोलापूरमध्ये प्रचंड खळबळ माजली असून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते. त्यांनी फक्त सोलापूरातीलच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरातील, जगभरातील अनेक रुग्णांवर उपचार केले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आत्महत्येचं कारण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 8.30 च्या सुमारास डॉ. शिरीष वलसंगकर यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्या घराच्या बाथरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य धावले, तेव्हा डॉक्टर हे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले होते. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झालाय

त्यांच्या आत्महचत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही, पण पोलिस सूत्रांच्या सांगण्यानुसार डॉ. वळसंगकर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या जवळच्या लोकांनीही याची पुष्टी केली. काही खासगी वा व्यावसायिक कारणामुळे ते तणावात होते, अशी चर्चा आहे, मात्र त्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डॉ. वळसंगकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरून परवानाधारक शस्त्र जप्त करण्यात आले आहे आणि फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा