भाजपच्या संपर्क कार्यालयाबाहेर फटाके फोडत हुल्लडबाजी करणारे कोण ? पोलिसांचं टेन्शन वाढलं…

नाशिकमध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चुंचाळे शिवारात नेहमीच अशा विविध दहशत निर्माण करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

भाजपच्या संपर्क कार्यालयाबाहेर फटाके फोडत हुल्लडबाजी करणारे कोण ? पोलिसांचं टेन्शन वाढलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 4:04 PM

Nashik Crime News : नाशिकच्या अंबड परिसरातील टवाळखोरांचा हैदोस (Nashik Crime News) काही केल्या कमी होत नाही. अंबड परिसरातील चुंचाळे शिवारातील भाजपच्या संपर्क कार्यालयाबाहेर (BJP Office) काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करीत फटाके फोडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे अंबड परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून एका राजकीय पदाधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिवाळीत या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि त्याच्या सोबत असणारा संशयित बाळा नागरे आणि त्याच्यासमवेत असलेल्या तरुणांनी फटाके फोडले होते.

पवार यांच्या घराच्या भिंतीलगत आरडाओरडा करीत फटाके फोडले. तसेच काहींनी त्यांच्या घरावर आणि दुकानावरही फटाके फेकल्याची बाब समोर आली आहे.

त्यानंतर संशयितांनी आरडाओरडा करत शिवीगाळ करत पळून गेले होते, याच संशयितांनी संदीप नरहरी तांबे यांच्या भाजप संपर्क कार्यालयाबाहेर पुन्हा फटाके फोडले.

हे सुद्धा वाचा

फटाके फोडल्याची बाब सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. असून संशयितांनी शिवीगाळ करत पोबारा केला.

एकूणच या घटणेमुळे परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? याबाबत अंबड पोलिसांकडून तपास केला जात आहे.

नाशिकमध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चुंचाळे शिवारात नेहमीच अशा विविध दहशत निर्माण करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

यशवंत शंकरराव पवार यांनी अंबड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.