AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा माझ्या जवळ येतोय, मला…; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा

सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्या चॅट्समधून आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसांतच पती राजा रघुवंशीला मारण्याची योजना आखली होती. त्यानुसार तिने दूरच्या ठिकाणी हनिमूनला जायचं ठरवलं होतं.

राजा माझ्या जवळ येतोय, मला...; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2025 | 12:47 PM
Share

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे त्यात नवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणात नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनम रघुवंशीने लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनंतर पती राजाला मारण्याची योजना आखली होती. तिचा प्रियकर राज कुशवाहसोबतच्या चॅट्समधून हे उघड झालं आहे. सोनम लग्नाच्या तीन दिवसांतच राजाला मारण्याची योजना आखल्याबद्दल प्रियकराला चॅटमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नानंतर सोनमला तिचा पती राजा रघुवंशीचं तिच्याजवळ येणं आवडत नव्हतं, हेदेखील त्या चॅट्समधून स्पष्ट झालं आहे.

सोनमने राज कुशवाहसोबतच्या चॅटमध्ये लिहिलं होतं की तिचा पती राजा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, जे तिला अजिबात आवडत नाहीये. सोनमने लग्नापूर्वीच राजा रघुवंशीपासून स्वत:ला दूर करायला सुरुवात केली होती. त्याची हत्या करण्यासाठी तिने राज कुशवाहसोबत मेघालयला जाण्याचा विचार केला होता. दोघांनीही जाणूनबुजून हत्येसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सोनमने गाझीपूरमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर मेघालय पोलीस तिला शिलाँगला घेऊन जात आहेत.

सोनम आणि राजा यांचं लग्न 11 मे रोजी इंदूरमध्ये झालं होतं. त्यानंतर 20 मे रोजी ते मेघालयला निघाले होते. 23 मे रोजी दोघंही बेपत्ता झाले होते. मेघालयमधील खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात एका धबधब्याजवळील खोल दरीत 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं राजाच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं होतं. राजाच्या हत्येनंतर सोनम गाझीपूरला कशी पोहोचली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

सोनम चौबेपूरमधील कैथी इथल्या टोल प्लाझाजवळच्या ढाब्यावर साडपली होती. तिथले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. हा टोल नाका वाराणसी ते गाझीपूर या मुख्य रस्त्यावर आहे. याशिवाय गाझीपूर शहर आणि त्याच्या बाहेरील भागात प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेर बसवले आहेत. सोनम कोणत्या वाहनाने तिथे आली आणि तिला तिथे कोणी सोडलं हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह कोण आहे?

सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांचा एख छोटा प्लायवूड कारखाना आहे. राज कुशवाह त्याच कारखान्यात काम करायचा. तो सोनमपेक्षा वयाने पाच वर्षांनी लहान असल्याचं म्हटलं जात आहे. सोनम अनेकदा तिच्या वडिलांच्या कारखान्यात जात असे. तेव्हाच तिची राजशी भेट झाली आणि हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनीही या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं होतं. त्याच्या काही दिवसांतच सोनमचं राजा रघुवंशीशी लग्न केलं. राजवर प्रेम असल्याने तिला राजा आवडत नव्हता.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.