AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे मृत्यू ही ओशाळला! आईच्या दागिन्यांसाठी हपापले भाऊ, थेट चितेवरच… नेमकं काय घडलं?

माणुसकीला काळिमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे. आईच्या अंत्यसंस्कारात मुलांनी दागिन्यासाठी भांडण केले.

इथे मृत्यू ही ओशाळला! आईच्या दागिन्यांसाठी हपापले भाऊ, थेट चितेवरच... नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 7:42 PM
Share

राजस्थानच्या कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईच्या निधनानंतर तिच्या चांदीच्या कड्यांसाठी तिच्या मुलांमध्ये वाद झाला. या घटनेत तर मर्यादा तेव्हा ओलांडल्या जेव्हा एका मुलाने आपल्या आईच्या चितेवर झोपून अंत्यसंस्कारापूर्वी चांदीचे कडे मागण्याचा हट्ट धरला.

आईच्या अंत्यसंस्कारात मालमत्तेचा वाद

या लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ ३ मे २०२५ पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मानवी संवेदनांना हादरवून सोडणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. तिच्या सात मुलांच्या कुटुंबात यापूर्वीच मालमत्तेवरून वाद सुरू होते. अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान स्मशानात मुलांमध्ये आणि नातवांमध्ये वाद सुरू झाला. जेव्हा एक मुलगा आणि नातू थेट महिलेच्या मृतदेहावर बसले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यांनी अट घातली की, जोपर्यंत आईचे चांदीचे कडे मिळणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाहीत. आईचे शव जमिनीवर पडले होते, पण मुलांच्या लालसेने मानवतेला काळिमा फासला. वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतरही तणावपूर्ण वातावरण

स्थानिक लोक आणि नातेवाईकांनी तासन् तास मुलांना आणि नातवांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुले आपल्या हट्टावर ठाम राहिली. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले. मृतदेहावर वारंवार झोपणे आणि बसण्याचा हा प्रकार पाहून लोकांना धक्का बसला. बराच वेळ गेल्यानंतर कसेबसे प्रकरण शांत झाले आणि अंत्यसंस्कार पार पडले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...