AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खं आयुष्य शेतात घालवलं, मुलांना वाढवलं, मुलाने हट्ट केला, पण त्याच हट्टासाठी त्याने…

मुलाचे लग्न झाले. घरात सून आली. शेतात राबून मुलाला वाढवलं, लग्न केलं. सून आली. त्यामुळे तो आनंदित होता. पण काही दिवस चांगले आणि घरात कुरबुरी सुरु झाल्या. त्याला मानसिक त्रास होऊ लागला.

अख्खं आयुष्य शेतात घालवलं, मुलांना वाढवलं, मुलाने हट्ट केला, पण त्याच हट्टासाठी त्याने...
Image Credit source: प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Jun 15, 2023 | 8:54 PM
Share

बांदा : तो आपल्या शेत जमिनीत आयुष्यभर राब राब राबला. मुलांना मोठे केले. स्वतःच्या पायावर उभे केले. ते याच शेतीच्या आधारावर. याच जमिनीने आपल्याला तारलं हे हि त्याला चांगलंच माहित होतं. आयुष्याची उतरण सुरु झाली. मुलं तरणीबांड झाली. त्यांचं लग्न झाली. घरात कलह सुरु झाला. पिता पुत्रांमध्ये नेहमी वाद होत होता. कंटाळून त्याने जागांची विभागणी केली. काही दिवस शांतपणे गेले. त्याने केलेली जमिनीची विभागणी मुलाला पसंद नव्हती. त्यामुळे पुन्हा करुबुरी सुरु झाल्या. शेजारचे कसेबसे त्यांना शांत करत. पण, त्याच्या मनात काही तरी वेगळंच होतं.

उत्तर प्रदेशातील बांदा येथील बरसाडा मानपूर गावात ते दोघे पिता पुत्र रहात होते. मुलाचे लग्न झाले. घरात सून आली. शेतात राबून मुलाला वाढवलं, लग्न केलं. सून आली. त्यामुळे तो आनंदित होता. पण काही दिवस चांगले आणि घरात कुरबुरी सुरु झाल्या. त्याला मानसिक त्रास होऊ लागला. सततच्या कलहाला कंटाळून त्याने शेत जमिनीची विभागणी केली. मुलाच्या नावे काही जमीन केली तर स्वतःच्या नावे काही जमीन ठेवली.

वडिलांनी केलेल्या या विभागणीमुळे मुलगा आनंदी नव्हता. तर, दुसरीकडे वडील आपल्या नावे असलेली जमीन विकण्याची तयारी करत होते. वडिलांच्या त्या निर्णयाला मुलाचा विरोध होता. यावरून पिता पुत्रांमध्ये वाद होत असे.

14 तारखेलाही जमिनीवरून पिता-पुत्रांमध्ये भांडण झाले. शेजारच्या लोकांनी त्यांना कसेबसे शांत केले. त्यानंतर संध्याकाळी जेवण करून सगळे झोपायला गेले. रात्र झाली. वडील उठले आणि त्यांनी संधी साधून मुलगा आणि सुनेची धारदार शस्त्राने हत्या केली. त्या दोघांची हत्या करून वडील तेथून फरार झाले.

सकाळ होताच या हत्याकांडाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. या प्रकारांची माहिती देताना एसपी अभिनंदन यांनी सांगितले, ही माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी मुलगा आणि सून दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते.

झोपेत असताना त्या दोघांवर शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. वडिलांनी मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यानंतर त्यांनी सुनेच्या मानेवर वार केले. घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. सध्या या प्रकरणी एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टीम तयार करण्यात आली असून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.