AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्कार केला नंतर केलं फुल देऊन प्रपोज, शिक्षाही स्थगित; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

एफआयआरनुसार पीडित महिला आणि दोषी व्यक्ती यांची फेसबुकवरून ओळख झाली होती. पीडित महिला ही दोषी व्यक्तीच्या बहिणीची मैत्रीण होती.

बलात्कार केला नंतर केलं फुल देऊन प्रपोज, शिक्षाही स्थगित; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
SUPREME COURT PROPOSE
| Updated on: May 15, 2025 | 9:18 PM
Share

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने गुरुवारी बलात्कारात दोषी ठरलेल्या व्यक्तीची शिक्षा स्थगित केली आहे. दोषी व्यक्तीने बलात्कार पीडित तरुणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दोघांनीही लग्न करण्याची व्यक्त केली इच्छा

न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. दोन्ही न्यायमूर्तींनी कोर्टरुममध्येच पीडित महिला आणि दोषी यांना एकमेकांना फुल द्यायला लावले. दुपारी जेवणासाठीच्या सुटीत न्यायमूर्तींनी पीडित महिला आणि दोषी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर कोर्ट चालू झाल्यावर न्यायमूर्तींनी दोषी व्यक्तीला पीडित तरुणीला प्रपोज करण्याचा आग्रह केला. या दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

सर्वोच्च न्यायालयाने दोषी व्यक्तीची शिक्षा स्थगित केली आहे. बलात्कार प्रकरणातील दोषी आणि पीडित तरुणी हे एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार असल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला. या दोघांचे लग्न नेमके कधी होणार, याबाबतचा निर्णय दोघांचेही पालक घेणार आहेत. या दोघांचेही लग्न लवकरात लवकर होईल. अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. 6 मे रोजी दिलेल्या निर्देशानुसार दोषी व्यक्ती आज (15 मे) न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने दोषी व्यक्तीची शिक्षा स्थगित केली असली तरी त्याला परत तुरुंगात पाठवले जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशाला दोषी व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे. अनुच्छेद 389 (1) नुसार माझी शिक्षा रद्द करावी, अशी मागणी या व्यक्तीने उच्च न्यायालयाकडे केली होती. उच्च न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावली होती. 2021 साली या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल झाला होता. लग्नाचे आमिष दाखवून या व्यक्तीने 2016 ते 2021 या काळात बलात्कार पीडित महिलेची फसवणूक केली होती, असा आरोप करण्यात आला होता.

दाखल एफआयआरनुसार पीडित महिला आणि दोषी व्यक्ती यांची फेसबुकवरून ओळख झाली होती. पीडित महिला ही दोषी व्यक्तीच्या बहिणीची मैत्रीण होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.