AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu : आई मित्राला सांगायची मुलीवर बलात्कार करायला, 4 वर्षात 8 वेळा अंडाशय विकलं, मोठा खुलासा होण्याची शक्यता

पीडितेचे आई-वडील 10 वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यानंतर ती तिच्या आईसोबत पुरुष मित्राच्या घरी राहत होती. अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत असलेली ही तरुणी मे महिन्यात घरातून पळून आपल्या मैत्रिणीकडे गेली.

Tamil Nadu : आई मित्राला सांगायची मुलीवर बलात्कार करायला,  4 वर्षात 8 वेळा अंडाशय विकलं, मोठा खुलासा होण्याची शक्यता
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.Image Credit source: TV9 Marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 07, 2022 | 1:04 PM
Share

मुंबई – तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एका आईने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार मित्राच्या मार्फत करायची. त्यानंतर तिच्या अंडाशयाची विक्री करीत असल्याचं प्रकरण नुकतचं उजेडात आलं आहे. हे प्रकरण सालेम (Salem) जिल्ह्यातील आहे. या अल्पवयीन मुलीवर आधी तिच्या आईच्या पुरुष मित्राने बलात्कार केला होता. नंतर तिचं अंडाशय हॉस्पिटलमध्ये (Hospital) विकल्याचे तपासात समोर आले आहे. बलात्कार पीडितेची आई आणि तिच्या पुरुष मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुलीवर बलात्कार करून तिचं अंडाशय विकण्याचा प्रकार 2017 पासून सुरू आहे अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षात 8 पेक्षा जास्त वेळा तिच्या अंडाशयाची विक्री करण्यात आली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मुलीशी बोलून समुपदेशन सुरू केल्याची माहिती समजली आहे.

वर्षातून दोनदा अंडाशय विक्री केलं जात होतं

पीडितेने मुलीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वेळी ती गरोदर राहिली की तिचं अंडाशय 20 हजार रुपयाला विक्री केलं जात होतं. यातील ५ हजार रुपये एक महिला कमिशन म्हणून घ्यायची आणि उर्वरित रक्कम आई आणि तिच्या मैत्रिणं ठेवून घ्यायची अशी माहिती उघडकीस आली आहे. हे वर्षातून दोनदा केले जात होते.

असा झाला प्रकरणाचा खुलासा

पीडितेचे आई-वडील 10 वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यानंतर ती तिच्या आईसोबत पुरुष मित्राच्या घरी राहत होती. अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत असलेली ही तरुणी मे महिन्यात घरातून पळून आपल्या मैत्रिणीकडे गेली. मुलीने हा प्रकार एका मैत्रिणीला सुरूवातीला सांगितला, त्यानंतर तिच्या मैत्रिणी आणि काही नातेवाईकांनी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची आई आणि तिच्या पुरुष मित्राला अटक केली आहे.

राज्य सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन केली

राज्याच्या आरोग्य सचिवांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक डॉक्टर आणि मोठ्या लोकांचा हात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे या प्रकरणातून मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...