Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : आता हॉटेलमध्ये जाणंही मुश्किल ! अल्पवयीन मुलीची वेटरनेच काढली छेड अन्..

एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुंबईमधील एका हॉटेलमधील वेटरला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलेली असताना ही घटना घडली.

Mumbai Crime : आता हॉटेलमध्ये जाणंही मुश्किल ! अल्पवयीन मुलीची वेटरनेच काढली छेड अन्..
नागपुरात घरफोडी प्रकरणी दोघांना अटक
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 10:08 AM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : हॉटेलमध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी वेटरला मुंबई पोलिसांनी अटक (waiter arrested by police) केली आहे. वांद्रे येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सोमवारी हा गैरप्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आधी त्या मुलीकडे टक लावून पाहत होता, नंतर त्याने तिला डोळाही मारला. एवढेच नव्हे तर थोड्या वेळाने त्याने तिच्याशी गैरवर्तनही (misbehave) केले, अशी माहिती समोर आली आहे.

अलपवयीन मुलीच्या पालकांना वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शाहबाद खान (वय 19) असे आरोपी वेटरचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. मात्र सध्या तो मुंबईतील हॉटेलमध्ये काम करत असून तेथेच राहतो.

हॉटेलमध्ये काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडत मुलगी (वय 13) ही तिचे कुटुंबीय आणि फॅमिली फ्रेंड्स यांच्यासोबत जेवणासाठी कोबे सीझलर्स या हॉटेलमध्ये गेली होती. ती पश्चिम उपनगरातील रहिवासी असून तिचे वडील हे व्यावसायिक आहेत. सोमवारी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील एक वेटर तिच्याकडे टक लावून पाहत होता, त्यानंतर त्याने तिला डोळा मारला. एवढेच नव्हे तर त्याची हिंमत इतकी वाढली की त्याने त्याचा मोबाईल नंबर लिहीलेला एक कागद तिच्या दिशेने फेकला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्शही केला, असे पोलिसांनी सांगितले.

यामुळे ती मुलगी घाबरली व तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाहबाद याच्याविरोधात कलम 354 (महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा), 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.