AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर

बुलेट गाडीला कंपनीने दिलेला सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश्श आणि कानठळ्या बसवणारा सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी केली होती.

कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर
अंबरनाथमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाई
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 06, 2021 | 3:00 PM
Share

अंबरनाथ : बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरवर आज अंबरनाथमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 150 पेक्षाही जास्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. (Thane Ambernath Police Destroys loud horn and modified silencers under Road Roller)

बुलेट गाडीला कंपनीने दिलेला सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश्श आणि कानठळ्या बसवणारा सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी केली होती. त्याची दखल घेत कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर ही कारवाई सुरु करण्यात आली होती.

कल्याण कर्जत राज्य महामार्गावर कारवाई

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वाहतूक शाखेने कारवाई करत नाकाबंदी दरम्यान 150 पेक्षा जास्त बुलेटचे सायलेन्सर कापून जप्त केले होते. तर अनेक गाड्यांचे प्रेशर हॉर्न सुद्धा जप्त करण्यात आले होते. या सगळ्यावर आज अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर कारवाई करण्यात आली.

साईबाबा नाक्याजवळ हे सगळे सायलेन्सर रस्त्यावर ठेवून त्यावरुन रोड रोलर फिरवण्यात आला. या कारवाईवेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्य्क पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड, अंबरनाथ विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, उल्हासनगर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तर बघ्यांनी सुद्धा या कारवाईवेळी मोठी गर्दी केली होती.

पोलिसांचं बाईकस्वारांना आवाहन

मॉडिफाइड सायलेन्सवर सुरु करण्यात आलेल्या या कारवाईत आत्तापर्यंत आठशेपेक्षा जास्त सायलेन्सर्सवर रोड रोलर फिरवण्यात आला असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. तसंच ही कारवाई करणं ही पोलिसांची मजबुरी असून कारवाई टाळायची असेल, तर ज्यांनी मॉडिफाइड सायलेन्सर लावले असतील, त्यांनी ते स्वतःहून काढून टाकावेत असं आवाहनही त्यांनी केलं. हे सायलेन्सर जे गॅरेजवाले बसवून देतात, त्यांच्यावरही कडक कारवाई सुरु करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बाळासाहेब पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या :

फॅन्सी नंबर प्लेटवाले पुन्हा ट्रॅफिक पोलिसांच्या रडारवर

VIDEO | रोड रोलरखाली कर्कश्श हॉर्न आणि सायलेन्सर चिरडले, लातूर पोलिसांचा धमाका

(Thane Ambernath Police Destroys loud horn and modified silencers under Road Roller)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.