क्षुल्लक भांडणात कुटुंबातच रंगला खुनी खेळ, एकाची हत्या, पोलिसांमुळे थोडक्यात बचावली महिला

पोलीस शिपाई सुनिल धोंडे यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

क्षुल्लक भांडणात कुटुंबातच रंगला खुनी खेळ, एकाची हत्या, पोलिसांमुळे थोडक्यात बचावली महिला
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 9:17 PM

ठाणे : ठाण्यातील किसननगर नंबर 2 इथं काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. सिनेमात घडावा तसा खुनाचा थरार काल ठाण्यात पहायला मिळाला. घरासंदर्भातील वाद इतका विकोपाला गेला की या वादात एकाची हत्या झाली तर एक महिला गंभीर जख्मी झाली होती. पण पोलीस शिपाई सुनिल धोंडे यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. (thane crime police constable Sunil Dhonde saved life of a woman in family fight one died)

विजय सदन, किसननगर नंबर 2 वागळे इस्टेट ठाणे येथे घराच्या जागेवरून वाद सुरु असल्याचा फोन श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये आला तोच पोलीस शिपाई मुकुंद राठोड आणि पोलीस शिपाई सुनिल धोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच विजय सदन या इमारतीतून एक महिला रक्कबंबाळ अवस्थेत धावत पोलिसांकडे आली. त्या महिलेच्या गळ्यावर कोणी तरी धारदार शस्त्राने वार केला होता. या महिलेचा जीव वाचेल की नाही असं वाटत असतानाच सुनिल धोंडे यांनी ओढणीने त्या महिलेचा गळा आवळून बांधला आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले

तर दुसरीकडे विजय सदन इमारतीतून अजूनही ओरडण्याचा आवाज येत होता. धोंडे आणि राठोड यांनी इमारतीच्या आत धाव घेतली आणि त्यांनी पाहिले की आरोपी हातात चाकू घेवून आरोपी आत्महत्या करण्याची धमकी देत होता. आणि त्याच्या पायाजवळ एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जीव धोक्यात टाकून धोंडे आणि मुकुंद राठोड यांनी त्या आरोपीला पकडले आणि त्याच्या हातून चाकू हिसकावून घेतला.

खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुरूषाला तपासले असता त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच तो आरोपी पोपटा सारखा बोलू लागला.

महेंद्र कर्डक असं आरोपीचं नाव असून गळ्यावर वार झालेल्या महिलेचे नाव निता कर्डक तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुरुषाचे नाव अजय कर्डक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. निता ही आरोपी महेंद्र कर्डकचा भाऊ राजन कर्डकची पत्नी आहे. तर विजय कर्डक हा नात्याने महेंद्र कर्डकचा भाऊ लागतो.

निता कर्डक राहत असलेल्या घरावरुन महेंद्र आणि निता यांचे वाद सुरु होते. काल हे वाद इतके विकेपाला गेली की महेंद्रने निता घराचा दरवाजा उघडत नाही म्हणुन दरवाजा तोडून घरात शिरला आणि तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणात पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे.

या दोन्ही पोलीस शिपाई यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच पोलीस आयुक्त ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी फोन करून अभिनंदन केलं. खरंच खूप चांगले वाटलं की आम्ही एका व्यक्तीचा जीव वाचवला आणि एका गुन्हेगारीला अटक केली अशी प्रतिक्रिया दोन्ही शिपायांनी दिली. (thane crime police constable Sunil Dhonde saved life of a woman in family fight one died)

संबंधित बातम्या – 

कचरा टाकण्यावरुन वाद, धारदार शस्त्राने तीन भावांकडून तरुणाची हत्या

प्रियकर-प्रेयसीचा कॉलेजबाहेर चिंचेच्या झाडाला गळफास

(thane crime police constable Sunil Dhonde saved life of a woman in family fight one died)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.