प्रियकर-प्रेयसीचा कॉलेजबाहेर चिंचेच्या झाडाला गळफास

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात चिंचेच्या झाडाला गळफास बांधून प्रेमी युगुलाने कॉलेज परिसरातच आयुष्य संपवलं

प्रियकर-प्रेयसीचा कॉलेजबाहेर चिंचेच्या झाडाला गळफास
गुन्हेगारी वृत्त

सोलापूर : महाविद्यालयाच्या आवारातच प्रियकर-प्रेयसीने चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात बी. पी. एड. कॉलेज परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे मयत तरुणी अल्पवयीन होती. (Couple Commits Suicide in Mohol Solapur hanging to tree outside college)

तोंडाला बांधायच्या स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास बांधून दोघांनी कॉलेज परिसरातच आयुष्य संपवलं. मयत तरुण 19 वर्षीय असून त्याच्यासोबत आत्महत्या करणारी तरुणी अल्पवयीन होती. प्रेमसंबंधांना विरोध झाल्यामुळे दोघांनी जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे.

मोहोळ तालुक्यात गेल्या वर्षभरात प्रेम प्रकरणातून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. प्रेमी युगलाने घेतलेल्या गळफास घेण्याच्या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

गेल्या वर्षी गुढीपाडव्यालाही युगुलाची आत्महत्या

सोलापुरात गुढीपाडव्याच्या मंगलदिनीच प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील भागात असलेल्या झाडावर या प्रेमी युगलाने गळफास घेतला होता. प्रेमाला घरातून विरोध असल्याने दहा दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. पोलीस आणि कुटुंबीय या दोघांचा शोध घेत होते.

त्या घटनेतील मृत प्रेयसी ही अल्पवयीन होती. त्यामुळे पोस्को कायद्यांतर्गत प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात होती.

संबंधित बातम्या :

पतीची हत्या करुन पत्नी प्रियकरासोबत लॉजवर, भीतीपोटी विषप्राशन, चिमुकलीचा मृत्यू

कुटुंबाचा प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या

(Couple Commits Suicide in Mohol Solapur hanging to tree outside college)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI