पतीची हत्या करुन पत्नी प्रियकरासोबत लॉजवर, भीतीपोटी विषप्राशन, चिमुकलीचा मृत्यू

एका प्रेमीयुगुलाने 2 वर्षाच्या चिमुरडीसह विष पिऊन आत्महत्या (couple suicide in lodge panvel) करण्याचा प्रयत्न केला आहे.

पतीची हत्या करुन पत्नी प्रियकरासोबत लॉजवर, भीतीपोटी विषप्राशन, चिमुकलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 10, 2019 | 5:55 PM

रायगड : एका प्रेमीयुगुलाने 2 वर्षाच्या चिमुरडीसह विष पिऊन आत्महत्या (couple suicide in lodge panvel) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना राडयगडमधील पनवेल येथील समीर लॉजमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेतील महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या करुन केरळमधून पनवेल येथे पळून आली होती. पत्नी लिजी कुरियन (29) आणि प्रियकर वसीम अब्दुल कादिर (35) अशी आत्महत्या (couple suicide in lodge panvel) करणाऱ्यांची नावं आहेत.

केरळ येथली संतापूरमधील एका कंपनीत काम करणाऱ्या लिजीचे त्याच कंपनीत काम करत असलेल्या वसीमसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. आपल्या प्रमेसंबधात लिजीचा पती रिजोश अडसर ठरत असल्याने तिने पती रिजोशची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने आपल्या दोन वर्षाच्या चिमुरडीसह आणि प्रियकरासोबत थेट पनवेलमध्ये पळून आली.

पती रिजोश याच्या हत्येप्रकरणी प्रियकर वसीमच्या भावाला केरळमधल्या संतापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या गुन्हात आपणही पोलिसांच्या कचाट्यात सापडले जाऊ या भीतीने पत्नी लिजी आणि वसीम यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गेले दोन दिवस हे पनवेल येथील लॉजमध्ये राहत होते. पण बराच वेळ झाल्याने त्या रुमधून कुणी बाहेर आले नाही म्हणून ते राहत असलेल्या 101 रुमचा दरवाजा ठोठावला. तरीही आतून काही आवाज येत नसल्याने तिथल्या कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती मॅनेजरला दिली आणि त्यानंतर मॅनेजरने त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी हे प्रेमीयुगुल आणि दोन वर्षीय चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्याचे आढळून आले.

लॉज चालकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी रुममध्ये किटकनाशकाचा उग्र वास रुममध्ये येत होता. या घटनेमध्ये दोन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. लिजी आणि वसिम या दोघांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुसळे अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.