Delhi Crime : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपींनी चालत्या ट्रेनमधून उडी घेत पळ काढला; बिहार-दिल्ली मार्गावरील घटना

पहाटे 3.23 वाजता पोलीस पथक प्रयागराज जंक्शनवरून निघाले, तेव्हा दिलशादने टॉयलेटला जात असल्याचे सांगितले. दोघांच्या हातात हातकड्या होत्या. त्यामुळे दोघे सोबतच टॉयलेटला गेले. गेटजवळ आल्यानंतर दोघांनीही पोलिसाला धक्काबुक्की करून पळ काढला.

Delhi Crime : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपींनी चालत्या ट्रेनमधून उडी घेत पळ काढला; बिहार-दिल्ली मार्गावरील घटना
सांगलीत बडोदा बँकेची 16 कोटीं 97 लाखाची फसवणूक
Image Credit source: tv9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 15, 2022 | 2:52 AM

नवी दिल्ली : बिहारमधून अटक (Arrest) केलेल्या दोन आरोपीं (Two Accused)ना दिल्लीला नेले जात होते. त्यावेळी दोन गुन्हेगारांनी प्रयागराज जंक्शनजवळ पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. दिल्ली पोलिस कर्मचारी दोघांना डिब्रूगड राजधानी येथून घेऊन जात असताना या दोन आरोपींनी चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि तेथून पळ (Escaped) काढल्याचे उघडकीस आले आहे. बराच शोध घेऊनही त्यांचा शोध लागला नाही, त्यानंतर एका हवालदाराच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता. या घटनेने बिहार आणि दिल्ली पोलीस यंत्रणेसह रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दिल्ली पोलिसांचे एक पथक डिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसने दोन आरोपी नसीम पुत्र बिहार शेख शकील उर्फ काला (रा. गाव बैरिया पोलीस स्टेशन, जिल्हा कटिहार) आणि मोहम्मद दिलशाद उर्फ डिल्लू पुत्र सिराजुद्दीन (रा. पहारपूर, जिल्हा कटिहार) या दोघांना घेऊन दिल्लीला माघारी परतत होते. यावेळी या दोन्ही आरोपींना सोबत घेऊन A-2 कोचमध्ये तीन पोलीस होते, तर इतर दोन पोलीस अधिकारी A-4 कोचमध्ये होते. याचदरम्यान आरोपींनी पोलिसांना हातावर तुरी देत त्यांच्या तावडीतून पळ काढला.

टॉयलेटला जातो सांगून पळाले

पोलीस पथकामध्ये सहभागी कॉन्स्टेबल जितेंद्र यांनी सांगितले की, पहाटे 3.23 वाजता पोलीस पथक प्रयागराज जंक्शनवरून निघाले, तेव्हा दिलशादने टॉयलेटला जात असल्याचे सांगितले. दोघांच्या हातात हातकड्या होत्या. त्यामुळे दोघे सोबतच टॉयलेटला गेले. गेटजवळ आल्यानंतर दोघांनीही पोलिसाला धक्काबुक्की करून पळ काढला. त्या पोलिसाने आपल्या सहकाऱ्यांना आणि दुसऱ्या कोचमध्ये बसलेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली, मग सर्वजण दोन्ही आरोपींचा शोध घेऊ लागले. यावेळी चेन खेचून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न पोलिसाने केला. मात्र आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्या पोलिसाला थांबवले आणि पुढील स्टेशनवर उतरून तेथील पोलिसांना कळवण्यास सांगितले.

कानपूरला सीसीटीव्ही फुटेज तपासले; आरोपींचा मात्र थांगपत्ता नाही!

कानपूरला पोहोचल्यावर पोलीस पथक ट्रेनमधून खाली उतरले आणि त्यांनी आरपीएफ पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले, पण आरोपींचा शोध लागला नाही. आरपीएफ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून संबंधित पोलीस पथक जीआरपी पोलिस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांना प्रयागराज जीआरपीकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास दिल्ली पोलिसांचे पथक पुन्हा जंक्शनवर आले आणि त्यांनी तक्रार दिली. जीआरपीचे निरीक्षक राजीव रंजन उपाध्याय यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

लाखोंच्या चोरीच्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी

दिल्लीत लाखोंच्या चोरीच्या गुन्ह्यातील दोन्ही फरार आरोपी हवे असल्याचे दिल्ली पोलिसांच्या वतीने जीआरपीला सांगण्यात आले. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास पोलीस स्टेशन परिसरात चोरीची घटना घडली आहे. दोघेही बिहारमध्ये असल्याची माहिती मिळताच 12 जुलै रोजी ग्रेटर कैलास पोलिस स्टेशनचे पाच सदस्यीय पथक बिहारमध्ये पोहोचले आणि त्यांना दोन्ही आरोपींना अटक केली होती. या टीममध्ये एसआय जितेंद्र, एसआय वरुण, एएसआय मेजर हुसेन, कॉन्स्टेबल अंकुर आणि हेड कॉन्स्टेबल जितेंद्र यांचा समावेश होता. अटकेनंतर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर झाल्यावर दोन्ही आरोपींना दिल्लीला नेले जात होते. त्यादरम्यान आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली. (The accused escaped by jumping from the moving train on the Bihar Delhi route)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें