तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरली!, चोरीचा बनाव ‘असा’ झाला उघड

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाश पंजाबी याच्या वडिलांना एप्रिल महिन्यात हार्ट अटॅक आल्यामुळे त्याला तातडीने पैशांची गरज होती. यावेळी त्याने त्याचा मित्र मुरली टेकचंदानी यांच्याकडून दोन लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते.

तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरली!, चोरीचा बनाव 'असा' झाला उघड
तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 6:11 PM

उल्हासनगर : मित्राकडून कर्ज घेताना तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरून नेल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडी चोरल्यानंतर मूळ मालकाने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याचा हा बनाव उघड झाला आहे. प्रकाश पंजाबी असे गाडी चोरणाऱ्या मूळ मालकाचे नाव आहे. पोलिसांनी चोरी केलेली गाडी जप्त केली आहे.

पैशांची गरज असल्याने मित्राकडे गाडी तारण ठेवत पैसे घेतले

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाश पंजाबी याच्या वडिलांना एप्रिल महिन्यात हार्ट अटॅक आल्यामुळे त्याला तातडीने पैशांची गरज होती. यावेळी त्याने त्याचा मित्र मुरली टेकचंदानी यांच्याकडून दोन लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते. त्या मोबदल्यात त्याने त्याची हुंडाई आय 10 ही गाडी मुरली टेकचंदानी याच्याकडे तारण म्हणून ठेवली होती.

एक दिवस गाडी पार्किंगमधून अचानक गायब झाली

ही गाडी मुरली टेकचंदानी याचा भाऊ बंटी टेकचंदानी हा वापरत होता. अंबरनाथ पूर्वेतील गोविंद पुलाजवळ ही गाडी तो उभा करून ठेवायचा. 29 सप्टेंबर 2022 रोजी रात्री ही गाडी बंटी याने नेहमीच्या ठिकाणी उभी करून ठेवली होती. मात्र दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी त्याला ही गाडी तिथे दिसून आली नाही. त्यामुळे त्याने याबाबत मोठा भाऊ मुरली याला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मुरली यांनी जवळपासच्या परिसरात गाडी शोधली. इतकंच नव्हे, तर गाडीचा मूळ मालक प्रकाश पंजाबी याला सुद्धा फोन करून तू गाडी घेऊन गेला आहेस का? अशी विचारणा केली. त्यावर प्रकाशने आपण गाडी नेलेली नसल्याचं सांगितलं.

आरोपीने मित्रासोबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली

यानंतर मुरली टेकचंदानी आणि प्रकाश पंजाबी हे दोघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांपुढे ही गाडी शोधण्याचं आव्हान होतं.

तांत्रिक तपासात प्रकाशवर संशय

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू केला. यामध्ये ज्यावेळी ही गाडी चोरीला गेली, त्यावेळी प्रकाश पंजाबी याचं मोबाईल लोकेशन गाडी उभी असलेल्या परिसरात दाखवत असल्याचं निष्पन्न झालं.

कर्ज चुकेल आणि गाडी मिळेल म्हणून हे कृत्य केल्याची कबुली

प्रकाश पंजाबी याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यानंतर आपणच आपली गाडी चोरून नेल्याची कबुली दिली. कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत करावे लागू नयेत आणि आपली गाडी आपल्याला फुकटात परत मिळावी, यासाठी ही गाडी चोरली.

यासाठी त्याने सुरज विश्वकर्मा आणि तरुण पाटील या दोघांना गाडीची त्याच्याकडे असलेली चावी दिली आणि ती गाडी तिथून घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर ही गाडी त्याने लपवून ठेवली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने गाडी चोरल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ही गाडी सुद्धा जप्त केली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.