kalyan News : ओळख असल्याचं सांगून डॉक्टरला दारु पाजली, दागिणे पैसे काढून घेतले, डॉक्टर शुद्धीत आल्यानंतर…
कल्याणमध्ये डॉक्टरला चांगली ओळख असल्याची जाणीव करुन दिली, त्यानंतर पार्टीसाठी तयार केले. दारु पाजल्यानंतर त्यांच्याकडचा दोन लाखांचा ऐवज लांबवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.

कल्याण : कल्याण (Kalyan news) एका डॉक्टरला रिक्षा चालकांनी गाठलं, चांगली ओळख असल्याची भासवलं. त्याचबरोबर डॉक्टरला पार्टीसाठी तयार केलं. पार्टी सुरु झाली, त्यावेळी तिघांनी डॉक्टरांना अधिक दारु पाजली. डॉक्टरांना इतकी दारु पाजली, डॉक्टरांची शुध्द हरपली होती. डॉक्टर शुद्धीत आल्यानंतर पैसे आणि सोने गायब झाल्याचं लक्षात आले, त्यानंतर डॉक्टरांनी थेट कल्याण बाजारपेठ पोलिस (kalyan market police) स्टेशन गाठलं. त्यांच्यासोबत झालेला सगळा प्रकार पोलिसांनी सांगितला. पोलिसांनी तात्काळ आरोपींची (kalyan crime news in marathi) शोधाशोध सुरु केली. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे.
नेमकं काय झालं
कल्याण पश्चिमेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका डॉक्टरला रिक्षा चालक त्याच्या साथीदारांनी ओळख काढली. पार्टीच्या नावाने त्याला बेधुंद होईपर्यंत दारू पाजून लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल होताचं, 24 तासांमध्ये आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कैंसर मलंग शहा, साबिर इमाम शेख, उर्फ दूरी, नमिर नईम शेख, सलीम अकबर शेख, अशी या आरोपींची नावे असून या आरोपींकडून एक १३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, दोन मोबाईल , दोन ऑटो रिक्षा, २३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ३ तीन हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात राहणारे डॉ. जवाहरलाल चिलगर यांनी कल्याण स्टेशनच्या बाहेरून खडकपाडा येथे जाण्यासाठी रिक्षा केली. यावेळी रिक्षाचालक व त्यांच्यासोबत तिघेजण त्या रिक्षात बसलेले होते. रिक्षा चालू झाल्यानंतर दोन्ही जणांनी डॉ. चिलगर यांना गोड बोलून पार्टी करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर पार्टी सुरु असताना त्यांच्याकडून वस्तू चोरल्या. त्यानंतर डॉक्टरांना बेशुद्ध अवस्थेत डोंबिवली परिसरात सोडून दिले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. काल पोलिसांनी चांगली कामगिरी करुन चौघांना ताब्यात घेतले आहे.
