VIDEO : भररस्त्यात थांबली महिला, समोरुन भरधाव बाईक आली अन्…

या व्हिडिओत एक महिला रस्त्यावरुन जात आहे. रस्ता ओलांडता ओलांडता महिला अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. त्यानंतर जे घडते ते खरोखरच धोकादायक आहे.

VIDEO : भररस्त्यात थांबली महिला, समोरुन भरधाव बाईक आली अन्...
भररस्त्यात थांबली महिला अन्...
Image Credit source: social
| Updated on: Nov 02, 2022 | 11:00 PM

रस्ता ओलांडताना सतर्क असणे महत्वाचे आहे. जरासं दुर्लक्ष तुम्हाला भारी पडू शकते. सोशल मीडियात अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे वाटते जसे या महिलेने स्वतःहून हे संकट ओढवून घेतते आहे.

या व्हिडिओत एक महिला रस्त्यावरुन जात आहे. रस्ता ओलांडता ओलांडता महिला अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. त्यानंतर जे घडते ते खरोखरच धोकादायक आहे.

काय आहे व्हिडिओत?

महिला रस्त्याच्या मधोमध उभी राहते, तितक्यात समोरून एक बाईक येताना दिसते. बाईकवाला दुसऱ्या बाजूने निघून जाईल, असे समजून ती महिला थांबते. पण दुचाकीस्वाराला वाटते की ती महिला रस्त्यातून दूर होईल.

व्हिडिओ ट्विटरवर शेअर

या गोंधळामुळे दुचाकी चालक आणि महिला यांच्यात जोरदार धडक झाली. व्हिडिओ पाहून असे दिसते की, दोष दोघांचाही होता. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओवर युजर्सच्या विविध कमेंट

व्हिडिओ पाहून काही लोक दुचाकीस्वाराला दोष देताना दिसत आहेत, तर काही महिलेला बेजबाबदार म्हणत होते. मात्र, अनेकांनी या अपघाताची जबाबदारी या दोघांवर लादली आहे.

व्हिडिओला लाखो व्ह्यूज

अवघ्या 6 सेकंदांचा हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक रस्ते सुरक्षेबद्दल चिंतित दिसत आहेत.