AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोराची सिनेस्टाईल पळवापळवी, किराणा दुकानदाराला हजारोंचा गंडा, मग नोकराचा मोबाईल हिसकावला, नंतर रस्त्यावर दुचाक्या उडवल्या

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एका किराणा दुकानदाराला एका अज्ञात आरोपीने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. आपल्या आईच्या उत्तर कार्यासाठी सामान लागणार असल्याची बतावणी करुन चोरट्याने 30 हजारांचा किराणा घेतला.

चोराची सिनेस्टाईल पळवापळवी, किराणा दुकानदाराला हजारोंचा गंडा, मग नोकराचा मोबाईल हिसकावला, नंतर रस्त्यावर दुचाक्या उडवल्या
चोराची सिनेस्टाईल पळवापळवी, किराणा दुकानदाराला हजारोंचा गंडा, मग नोकराचा मोबाईल हिसकावला, नंतर रस्त्यावर दुचाक्या उडवल्या
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 6:42 PM
Share

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एका किराणा दुकानदाराला एका अज्ञात आरोपीने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. आपल्या आईच्या उत्तर कार्यासाठी सामान लागणार असल्याची बतावणी करुन चोरट्याने 30 हजारांचा किराणा घेतला. आरोपी कार घेऊन आला होता. पण त्याने आपण पैसे घरीच विसरल्याचे सांगून दुकानातील नोकराला आपल्यासोबत पाठवण्यास सांगितलं. आपण घरी पोहोचल्यावर नोकराकडे पैसे देवू, असं आरोपीने सांगितलं. पण चोरट्याने रस्त्यातच नोकराच्या जवळील मोबाईल हिसकावला आणि तो गाडीने पसार झाला. त्यानंतरही त्याने जी पळवापळवी केली त्याची शहरात चर्चा सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

यावल शहरात नाझीम खान यांच्या मालकीचे खानदेश प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. नाझीम दुकानात असताना एक इसम तिथे आला. त्याने आपल्या आईचं उत्तर कार्य असल्याचे सांगून 30 हजारांचा माल खरेदी केला. यामध्ये 15 किलो तेलाचे पाच डब्बे, बासमती तांदूळ 75 किलो, 25 किलो मुगडाळ, एक-एक किलो काजू बदाम आणि मसाल्याचे इतर साहित्य असा 30 हजार रुपयांचा किराणामाल घेतला. त्यानंतर त्याने स्वत:च्या खिशात हात घातला. तसेच गाडीत पॅकेट शोधण्याचं नाटक केलं. पण पॅकेट मिळालं नाही, असं त्याने दुकानदाराला सांगितलं.

आरोपीने दुकानातील नोकराचा मोबाईल हिसकावला

“तुमचा माणूस माझ्यासोबत पाठवा. मी पैसे घरी विसरुन आलो आहे”, असे सांगून तो दुकानातील नोकराला घेऊन गेला. त्यानंतर त्याने नोकराला एका ठिकाणी थांबून त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला धक्का देवून तो गाडी घेऊन पसार झाला. नोकराने तातडीने दुकान गाठत आपल्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार आपल्या मालकाला नाझीम खान यांना सांगितला. खान यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची नाकाबंदी, चोराची पळवापळवी

पोलिसांना चोरीची घटना माहिती पडल्यानंतर त्यांनी तातडीने नाकाबंदी केली. त्यानंतर संशयित आरोपीने भुसावळकडे येतांना दोन दुचाकी चालकांना उडवले. त्यानंतर भुसावळ शहरात आल्यानंतर एका दुचाकी चालकालाही कट मारला. मात्र त्या दुचाकी चालकाने त्याचा पाठलाग केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता. पण तो तापी नगर भागामध्ये पुढे रस्ता नसल्याने फसला. पण चोर तिथेही थांबला नाही. त्याने गाडी तिथेच सोडली आणि तिथून पळून गेला.

पोलिसांकडून तपास सुरु

विशेष म्हणजे संबंधित दुकानदाराला याआधी देखील दोन वेळा अशाचप्रकारे फसविण्यात आलं आहे. त्यामुळे यावल पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खरंतर ही लुटणारी मोठी टोळीच असू शकते, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्याच दृष्टीने आपला तपास करत आहेत.

हेही वाचा :

सोन्याच्या बिस्किटांचे आमिष देवून महिलेच्या अंगावरील दागिने पळवले, घटना सीसीटीव्हीत कैद

गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं, तीन स्त्रियांना शिताफीने अटक, NCB ची धडक कारवाई

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.