पोलिसांना पाहून त्याने गिळली सोन्याची चेन, जीवावरच बेतले होते

पोलिसांनी पकडल्यानंतर एका चेन स्नॅचरने लुटलेली सोन्याची साखळी गिळून टाकली. मात्र ती साखळी श्वासनलिकेत अडकल्याने त्याला त्रास होऊ लागला आणि त्याची क्लुप्ती त्यालाच भारी पडली.

पोलिसांना पाहून त्याने गिळली सोन्याची चेन, जीवावरच बेतले होते
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 11:03 AM

रांची : सध्या रांचीसह झारखंडमधील विविध जिल्ह्यांमध्ये महिलांसोबत चेन स्नॅचिंगच्या (chain snatching) घटना झपाट्याने वाढल्या आहेत. रांचीच्या पोलीस स्टेशन परिसरात दररोज महिलांकडून चेन स्नॅचिंगच्या तक्रारी समोर येत आहेत. चेन स्नॅचरवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे (police) पथक संवेदनशील ठिकाणी सतत गस्त घालत असते. दरम्यान, जगन्नाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सॅटेलाइट चौकाजवळ एका महिलेची चेन हिसकावून पळून गेलेल्या दोन चोरट्यांना (thief), चोरी करणे फारच महागात पडले आहे.

खरंतर, पोलिसांच्या गस्ती पथकात उपस्थित असलेल्या पोलिसांना महिलेकडून साखळी लुटल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ धाव घेत सलमान मलिक उर्फ ​​छोटू आणि जफर उर्फ ​​लल्ला या दोघांना सुमारे एक किलोमीटर पळून जाऊन पकडले. पोलिसांनी पकडले असता, चेन स्नॅचर सलमान मलिकने लुटलेली सोनसाखळी तोंडात टाकून गिळली. गिळल्यामुळे, साखळी थेट सलमान मलिकच्या श्वासनलिकेत अडकली, त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि वेदनांनी तो ओरडू लागला.

आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले

हटिया डीएसपीने आरोपी सलमान मलिकला तात्काळ रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल केले, जिथे शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. एक्स-रे अहवालानंतर डॉक्टरांना आरोपी सलमान मलिकच्या अन्ननलिकेमध्ये साखळी अडकल्याचे आढळून आले. आता डॉक्टर आरोपी सलमान मलिकच्या फूड पाईपमध्ये अडकलेली साखळी शस्त्रक्रिया करून बाहेर काढणार आहेत.

काही दिवसांपूर्वी दोघेही तुरुंगातून बाहेर आले

जगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सॅटेलाइट चौकाजवळ एका महिलेची साखळी लुटून पळून गेलेले आरोपी सलमान मलिक आणि जफर उर्फ ​​लल्ला हे दोघे हिंदपिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. दोघांचाही जुना गुन्हेगारी इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघेही तुरुंगातून बाहेर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रांचीमध्ये चेन स्नॅचिंगच्या बहुतांश घटनांमध्ये या दोन आरोपींचा सहभाग आहे.

बनावट नंबरप्लेट असलेल्या वाहनांचा करायचे वापर

हे दोन्ही चोरटे अनेकदा एकट्या जाणाऱ्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात छायाचित्रे कैद झाली तरी ते पकडले जाऊ नयेत, यासाठी ते बनावट क्रमांक असलेल्या मोटारसायकलचा वापर करून चेन लुटायचे. मात्र, यावेळी दोन्ही चोरट्यांनी लुटलेली सोनसाखळी त्यांच्या जीवावर बेतली.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.