सोनम रघुवंशीपेक्षा भयानक डोकं.. प्रियकरासह मिळून पतीचा काढला काटा, जंगलात फेकला मृतदेह…
उत्तराखंडमधील कोटद्वार येथे मालमत्तेच्या वादातून एका पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. रीना सिंधू नावाच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिलीभगत करून पती रवींद्र कुमार याची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात फेकला. रवींद्र यांचे मुरादाबाद येथे 3 कोटींचे घर होते, जे विकण्याच्या प्रश्नावरून दोघांमध्ये वाद होत असे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. ही घटना खळबळ उडवून देणारी ठरली आहे.

राजा रघुवंशी याच्या निर्घृण हत्येमुळे सध्या संपूर्ण देश सुन्न झाला असून रोज सोनमच्या नव्या कारनाम्यांचा खुलासा होत आहे. हे कमी की काय म्हणून आता आणखी एका पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून आपल्याच पत्नीची क्रूरपणे हत्या केली, एवढंच नव्हे तर त्याचा मृतदेह जंगलातही फेकून दिला. उत्तराकंडमधील या घटनेने आता माणुसकीवरचा विश्वासच उडाला आहे. या कलियुगात कोटद्वार येथे एका पत्नीने पतीचा निर्घृणपणे खून करत त्याच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्यासाठी तो जंगलात फेतकला. पोलिसांकडून या नव्या हत्याकांडाचा आता खुलासा झाला आहे. त्याचेच एकेक हादरवणारे अपडेट्स आता समोर येत असून पोलिसही हैराण झाले आहेत.
खरंतर, काही दिवसांपूर्वी कोटद्वारमध्ये रवींद्र कुमार नावाच्या एका पुरूषाचा मृतदेह आढळला होता. रवींद्र हा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे राहत होता. पोलिसांनी तपास सुरू केला अखेर बऱ्याच चौकशीनंतर ही हत्या म्हणजे त्याच्याच पत्नीचे कृत्य उघडकीस आले. मालमत्तेमुळे आणि परितोष या दुसऱ्या पुरूषासोबतच्या अवैध संबंधांमुळे पत्नी रीना सिंधूने तिच्या पतीची हत्या केल्याचे उघड झाले. एवढंच नव्हे तर रीनाने तिच्या पतीचा मृतदेह जंगलातही फेकून दिला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आणि तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी रीना आणि तिच्या प्रियकराला अटक करत तुरुंगात पाठवले.
या कारणामुळे थेट पतीलाच संपवलं
पोलिसांच्या चौकशीदरम्यान रीनाने जे कारण सांगितलं ते ऐकून पोलिसही हादरले. रीनाचा पती रवींद्र यांचे मुरादाबादमध्ये 3 कोटी किमतीचं मोठं घर आहे. रवींद्र याला ते घर विकायचं होतं पण रीनाचा या गोष्टीला विरोध होता. याचदरम्यान तिची भेट परितोष कुमारशी झाली. तो फिजिओथेरपीसाठी तिच्याकडे रुग्ण म्हणून आला होता. दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी रीनाच्या पतीचा काटा काढण्याचा कट रचला.
लाखोंचं मिळायचं भाडं
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र 56 वर्षांचा होता, तर रीना सिंधू सुमारे 36 वर्षांची आहे. रवींद्र उत्तराखंडमधील दोईवाला येथे भाड्याने राहत होता. रवींद्रची रीनाशी तिथे भेट झाली. त्यानंतर रवींद्रने 2011 साली मध्ये रीनाशी लग्न केले. रीना आणि रवींद्र यांना दोन मुलंही आहेत. याच दरम्यान, रवींद्रने दिल्लीतील राजोकरी येथील त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून मुरादाबादमध्ये तीन मजली घर खरेदी केले, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये होती. हे घर मुरादाबादमधील राम गंगा विहारमधील सोनकपूर स्टेडियमजवळ आहे. हा संपूर्ण परिसर आलिशान आहे. रविंद्र यावा तिथून लाखो रुपयांचं भाडं मिळायचं.
घरावरून वाद सुरू
मात्र रविंद्रच्या डोक्यावर खूप कर्ज होतं. आणि कर्जाची ती रक्कम फेडण्यासाठी तो घर विकू इच्छित होता. पण रीना त्याला घर विकू देऊ इच्छित नव्हती. या प्रकरणावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत असे. अखेर रीनाने तिच्या प्रियकरासोबत हे भयानक पाऊल उचलले आणि रविंद्रची हत्या करत जंगलात मृतदेह फेकला.
हे जोडपं बऱ्याच काळापासून दोईवाला येथे भाड्याने राहत होते. त्यांना 11 वर्षांची एक लहान मुलगी आहे, परंतु त्यादरम्यान एक व्यक्ती वारंवार घरी येत असे. आपण त्या महिलेचा नातेवाईक असल्याचा दावा करत असे. सध्या मृताच्या कुटुंबात गोंधळ आहे अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. पोलिसांनी रीना आणि तिच्या प्रियकराला अटक करत तुरूंगात पाठवलंय.
