AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Drowned Death : सोलापूरमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू

शेटफळमधील गोरख डोंगरे यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्यात गावातील तीन शाळकरी मुले दुपारच्या सत्रात पोहण्यासाठी गेली होती. गावातील तांबट समाजातील ही तीनही मुले होती. मात्र शेततळ्यात उतरल्यानंतर त्यातील दोघांना पोहता येत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Solapur Drowned Death : सोलापूरमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू
सोलापूरमध्ये शेततळ्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 10:29 PM
Share

सोलापूर : शेततळ्यात बुडून 3 बालकां (Children)चा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शेटफळ या गावात घडली आहे. शेटफळमधील देवीचा माळ परिसरात ही घटना घडली. विनायक भरत निकम (8), सिध्दार्थ भरत निकम (7) आणि कार्तिक मुकेश हिंगमीरे (7) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. शेततळ्यात पोहण्या (Swimming)साठी गेली असता ही घटना घडली. मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मयत बालकं तांबटकरी समाजातील होती. या शेततळ्याला तारेचे कुंपण नसल्याची माहिती समोर येत आहे.

पोहता येत नसल्यामुळे बुडाली मुले

शेटफळमधील गोरख डोंगरे यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्यात गावातील तीन शाळकरी मुले दुपारच्या सत्रात पोहण्यासाठी गेली होती. गावातील तांबट समाजातील ही तीनही मुले होती. मात्र शेततळ्यात उतरल्यानंतर त्यातील दोघांना पोहता येत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विनायक निकम (8), सिध्दार्थ निकम (7) आणि कार्तिक हिंगमिरे (7) हे तिघे शेततळ्यात उतरले. मात्र यातील दोघांना पोहता येत नसल्याने दोघांनी एकाला पकडल्याने तिघेही बुडाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

यामध्ये मुकेश हिंगमिरे हे मुळचे शेटफळ गावाचे रहिवासी आहेत. तर त्यांचे भावजी भरत निकम हे देखील माचणूर या गावातून मेव्हणे मुकेश हिंगमिरे यांच्याकडे स्थायिक झाले होते. दरम्यान त्यांचा तांबटाचा व्यवसाय आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास या दोन्ही कुटुंबातील मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर या तीनही मुलांना जवळच्या खासगी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र तेथून त्यांना मोहोळ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांकडू देण्यात आली. दरम्यान या घटनेची नोंद मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम.
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य.