चलो कुछ तूफानी करते हैं… तीन मित्र एअरपोर्टवर गेले, वेषांतर करून असं काही केलं की उडाली खळबळ; का उडाला थरकाप?
एअरपोर्ट वेशांतर करून तीन मित्रांनी माजवली खळबळ, चलो कुछ तूफानी करते हैं...च्या नादात तुरुंगात... का उडाला सर्वत्र थरकाप? जाणून तुम्हाला देखील बसेल मोठा धक्का...

तीन मित्र त्यातील पहिला बीसीए, दुसरा बीटेक आणि तिसरा एमसीए… तीन मित्र पार्टी करण्याच्या उद्देशाने एका जागी भेटतात… आणि चलो कुछ तूफानी करते हैं… नानात असं काही करतात ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजते… तिघे दिल्लीच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जातात… यानंतर, तिघेही एक गुन्हा करतात ज्यामुळे विमानतळ पोलिसांमध्ये घबराट निर्माण होते.
आयजीआयच्या एअरपोर्ट पोलिसांनी तिन्ही मित्रांना अटक केली आहे. त्यांची ओळख 25 वर्षीय गर्वित शर्मा, 22 वर्षीय प्रशांत आणि 23 वर्षीय अनिकेत अशी झाली आहे. दिल्लीतील पालम गावातील रहिवासी गर्वित हा बीसीए आहे, तर दशरथपुरी येथील रहिवासी प्रशांत हा बीटेक आहे आणि किशनगढ गावातील रहिवासी अनिकेत हा एमसीए आहे. या तिन्ही मित्रांना गंभीर कलमांखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (IGI विमानतळ) उषा रंगनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून 2025 च्या संध्याकाळी जवळपास 7.27 वाजता आयजीआय एअरपोर्टच्या पीसीआरला एक कॉल येतो. कॉल करणारा फिर्यादी अमरपाल सिंह पोलिसांना सांगतो, स्वतःला पोलीस अधिकारी सांगणाऱ्या तिघांनी माझी दुचारी पळवली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अमरपाल सिंह यांनी सांगितलं, एयरोसिटी परिसरात जीएमआर रक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून एरोसिटीला जात होता, तेव्हा महिपालपूर अंडरपासजवळ तीन तरुणांनी त्याची मोटरसायकल थांबवली.
तिघांनी स्वतःला पोलीस सांगतलं आणि वेगाने गाडी चालवत असल्याचे आरोप माझ्यावर लावले. अमरपाल याने जेव्हा ओळखपत्र मागितलं तेव्हा तिघांपैकी एकाने शिव्या दिल्या आणि दुसऱ्याने कानशिलात लगावली. त्यानंतर अमरपाल याच्याकडून गाडीची चावी घेवून तिघे फरार झाले. तक्रारदाराच्या जबाबाच्या आधारे, आयजीआय विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला असू तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी परिसरातील जवळपास 250 – 300 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. अनेक तासनतासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाच्या बजाज एन्टीसर मोटरसायकलचा नंबर सापडला. ही मोटरसायकल शकरपूर येथील सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती.
पोलिसांना तात्काळ सिद्धार्थ याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान सिद्धार्थने सांगितले की, त्याने ही मोटारसायकल सुमारे एक वर्षापूर्वी पालम गावात राहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या गर्वित शर्माला विकली होती. त्यानंतर पोलिसांनी गर्वित शर्माचा तपास सुरु केला. पोलिसांनी त्याला फोन केला पण संपर्क झाला नाही. शिवाय तो घरी देखील नव्हता.
त्यानंतर पोलिसांनी स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने आणि तांत्रिक देखरेखीखाली पालम परिसरातून गर्वित शर्माला अटक केली. चौकशीदरम्यान गर्वितने गुन्ह्यातील स्वतःची भूमिका कबूल केली आणि त्याचे दोन साथीदार प्रशांत कुमार आणि अनिकेत यांच्याबद्दल देखील सांगितलं.
गर्वितने खुलासा केला की 26 रोजी प्रशांत याने त्याला फोन केला आणि अनिकेत याच्या घरी किशनगड येथे गेले. तेथे तिघांनी दारू प्यायली आणि काही तर हटके करू असं प्रशांत याने सांगितलं. यानंतर, त्यांनी बनावट पोलिस असल्याचं भासवून मोटारसायकल लुटण्याचा कट रचला. महिपालपूर उड्डाणपुलाजवळ त्यांनी अमरपालची मोटारसायकल पाहिली आणि त्याला थांबवलं.
प्रशांतने चाव्या हिसकावून मोटारसायकल घेऊन पळ काढला, तर गर्वित आणि अनिकेत त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. नंतर, भीतीमुळे त्यांनी चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल जनक सिनेमाजवळ सोडून दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
