संतापजनक ! एकाने कुत्रीला जबरदस्ती पकडलं, दुसऱ्याकडून बलात्कार, तिसऱ्याकडून व्हिडीओ शूट, किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल

काही नराधम इतके विकृत असतात की ते कुत्र्यांनादेखील सोडत नाहीत (three youth rape on dog)

संतापजनक ! एकाने कुत्रीला जबरदस्ती पकडलं, दुसऱ्याकडून बलात्कार, तिसऱ्याकडून व्हिडीओ शूट, किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल
प्रातिनिधिक फोटो

चंदीगढ : काही नराधम इतके विकृत असतात की ते कुत्र्यांनादेखील सोडत नाहीत. वासनेच्या भूकेपाई ते श्वानावरही बलात्कार करण्यास मागेपुढे बघत नाहीत. पंजाबच्या भोगपूर शहरात अशीच एक किळसवाणी आणि संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेवर सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त केला जातोय. आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करुन योग्य शिक्षा द्या, अशी मागणी सोशल मीडियावर वाढत आहे (three youth rape on dog).

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीन तरुण प्रचंड घृणास्पद कृत्य करताना दिसत आहेत. व्हिडीओत तीन तरुणांपैकी एक तरुण नग्न आहे. तो एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार करताना दिसतोय. दुसरा आरोपी कुत्रीला पकडतो. तर तिसरा आरोपी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो. हा संपूर्ण किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे (three youth rape on dog).

नेटीझन्सकडून कारवाईची मागणी

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओतील तरुण हे पंजाबच्या भोगपुरी येथील रहिवासी आहेत, अशी माहिती त्यानंतर समोर आली आहे. या व्हिडीओवर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. भोगपूरच्या नागरिकांनी देखील या घृणास्पद कृत्यावर आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पोलिसांपर्यंत व्हिडीओ पोहोचला

दरम्यान, संबंधित व्हिडीओ हा भोगपूरच्या पोलीस ठाण्यापर्यंत देखील पोहोचला. भोगपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख मनजीत सिंह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्हाला या घटनेची माहिती माध्यांमाद्वारेच मिळाली. संबंधित व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. आम्ही त्याचा तपास सुरु केला आहे. व्हिडीओतील तरुणांची ओळख पटल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने अटक करुन योग्य कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया मनजीत सिंह यांनी दिली.

याआधी मुंबईतही कुत्र्यावर बलात्काराची घटना

श्वानावर बलात्काराची ही पहिलीच घटना नाही. विशेष म्हणजे मुंबई सारख्या प्रख्यात शहरातही अशा प्रकारची किळसवाणी घटना घडल्याचं गेल्या दोन महिन्यांपूर्वी समोर आलं होतं. मुंबईत अहमद शाह नावाच्या 68 वर्षीय वृद्धाने कुत्रीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं निर्लज्ज उत्तर अहमद शाहीने दिलं होतं.

संबंधित बातमी : मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी म्हणतो प्राण्यांना आक्षेप नाही, तर गुन्हा कसा?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI