मौत का गॅस चेंबर… गटारात उतरले अन् त्या तिघांचे मृतदेहच बाहेर आले

शहरातील पाली रोडवरील केशव नगर येथील सेंच्युरी गार्डनमध्ये ही घटना घडली. मॅरेज गार्डनमधील गटाराचे चेंबर जाम झाले होते, सफाई कामगार ते साफ करण्यासाठी आले होते, तेव्हा ही दुर्घटना घडली.

मौत का गॅस चेंबर... गटारात उतरले अन् त्या तिघांचे मृतदेहच बाहेर आले
Image Credit source: tv9
| Updated on: May 06, 2023 | 10:03 AM

पाली : राजस्थानमधील (Rajasthan) पाली येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका मॅरेज हॉलमधील सांडपाणी वाहून नेणारे चेंबर साफ (cleaning the sewer) करताना तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, सीवरेज चेंबरमध्ये अडकलेल्या इतर एका तरुणाची सुटका करण्यात आली आहे. त्या युवकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मात्र, कोणीतरी फोन करून घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शहरातील पाली रोडवरील केशव नगर येथील सेंच्युरी गार्डनमध्ये ही घटना घडली. या घटनेबाबत सांगण्यात येत आहे की, मॅरेज हॉलच्या बागेतील गटाराचे चेंबर जाम झाले होते, त्यामुळे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पाच सफाई कामगार चेंबर साफ करण्यासाठी आले.

स्थानिकांच्या सांगण्यानुसार, लग्न समारंभात जे वाया गेलेले अन्न किंवा इतर कचरा होता तोही चेंबरमध्ये गेला. ही साफसफाई करण्यासाठी 4 जण गटाराच्या चेंबरमध्ये घुसले होते. तर एक तरूण देखरेखीसाठी वर उभा होता. त्या चेंबरमध्ये खोलवर गेल्यावर हे चार तरुण विषारी वायूच्या विळख्यात आले. चौघेही चेंबरमध्ये बेशुद्ध पडले. चेंबरमधून कोणतीही हालचाल न झाल्याने वर उभा असलेला तरुण दोरीच्या सहाय्याने टाकीत उतरला. पण, त्याचाही जीव गुदमरायला लागला आणि तो लगेच वर आला.

या दुर्दैवी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मड पंपाच्या साहाय्याने सिव्हरेज चेंबरमधून सर्व कचरा बाहेर काढला. विशाल (28) , करण (22) , मुकेश आणि भरत (20) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून, त्यांचे मृतदेह बांगर रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. त्याचवेळी या अपघातात 22 वर्षीय हृतिक वाल्मिकीची प्रकृतीही ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

सफाई कामगारांकडे सीवरेज चेंबर साफ करण्यासाठी सुरक्षा उपकरणे असणे आवश्यक आहे. मात्र, त्याशिवायच ते चेंबरमध्ये घुसले होते. केशव नगर येथील सेंच्युरी गार्डन येथील सिव्हरेज चेंबरचे काम नियमानुसार झालेले नाही. तो रस्त्यावर बांधला आहे.