घरातच प्रेम फुललं… पण तो दुसऱ्याचा झाला, त्यानंतर शेतात गेलेल्या तरुणीने…
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती मामाच्या मुलाच्या प्रेमात होती. कुटुंबाने मुलाचे लग्न दुसरीकडे लावल्यावर तिने जीवन संपवलं. तरुणीने आपल्या प्रियकराला बोलावलं आणि नंतर शेतातील झाडाला गळफास घेतला. पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह इतर आरोपींना अटक केली आहे.

जेव्हा प्रेम होतं तेव्हा ना वय पाहिलं जातं, ना सौंदर्य. प्रेम हे निव्वळ प्रेम असतं. काळीज धडकतं आणि माणूस प्रेमात पडतो. पण कधी कधी प्रेम अशा व्यक्तीवरही होतं की जो समाजाच्या विरोधात असतो. प्रवाहाच्या उलट जाणारा असतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे घडला आहे. एका तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेला सापडला. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि एक एक हृदयद्रावक तशीच धक्कादायक माहिती समोर आली.
पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासे झाले. ही तरुणी मामाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. दोघांचं प्रेमप्रकरण होतं. या तरुणीची आजी फर्रूखााद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे राहते. दोन वर्षापूर्वी आजीचा मृत्यू झाला. त्यामुळे ही तरुणी मामाच्या घरी आली. त्यावेळी मामाच्या मुलाच्या संपर्कात आली.
दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. बोलता बोलता दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले ते कळलंच नाही. घरातल्या लोकांना जेव्हा घरातच फुलणााऱ्या प्रेमाची कुणकुण लागली तेव्हा ते त्रस्त झाले. वैतागले. त्यामुळे घाईगडबडीत मामाने आपल्या मुलाचं दुसरीकडे लग्न लावून दिलं. मुलाचं लग्न लावून दिल्यानंतर आता सर्वकाही ठिक होईल. दोघांमध्ये प्रेमसंबंध राहणार नाही, असं मामाला वाटलं. पण त्यांचं तो केवळ भ्रम होता. काळाच्या उदरात दुसरंच काही दडलं होतं.
तिने त्याला बोलावलं
या तरुणीने मंगळवारी वडिलांच्या फोनवरून मामाच्या मुलाला फोन केला. त्यानंतर तिने गुरुवारी सकाळी रसूलाबाद अंडरपास येथे भेटण्यासाठी तिला बोलावलं. मामाचा मुलगा गुरुवारी ठरल्याप्रमाणे आला. त्यावेळी या तरुणीने त्याच्यासोबत जाण्याचा तगादा लावला. त्यानंतर या मुलाने तरुणीच्या गावात राहणाऱ्या आपल्या काकाला, काकाच्या मुलाला, वडिलांना आणि तरुणीच्या वडिलांना बोलावलं. सर्वजण या तरुणीला घेऊन नगला सुदामामध्ये एका नातेवाईकाच्या घरी पोहोचले. या ठिकाणी बराच वेळ या तरुणीला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ती हट्टाला पेटली होती.
तिचा शेवटचा दिवस
त्यानंतर ही तरुणी शेताच्या दिशेने गेली. कुटुंबीयांना माहिती पडल्यानंतर तेही तिच्या मागे मागे तिला शोधायला गेले. तोपर्यंत ही तरुणी कांसेपूर बंबाजवळील एका शेतातील एका झाडावर चढली. तिने दुपट्ट्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलिसांनी मामाचा मुलगा आणि मावशीच्या मुलाला अटक केली आहे. या तिघांवर कुटुंबीयांनी गंभीर आरोप लावले आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहे. लग्नानंतर या मुलीशी संबंध तोडायचे होते. पण ती लग्नाचा दबाव टाकत होती, असं या मुलीच्या प्रियकराने म्हटलंय. तर मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांचे रडून रडून हाल झाले. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
