श्रीमंत व्हायचे असेल तर लिंबाच्या झाडाखाली…; तांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, दोघांनी लाडू खाताच…
आंधश्रद्धेवर विश्वास ठेवून जमिनीत दडलेला खजिना शोधताना दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणाचा तापास करत आहेत.

उत्तर प्रदेश येथील फिरोजाबादमधील मक्खनपुर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. ठाणे क्षेत्रातील गाव गोकुल येथील रहिवासी रामनाथ आणि ठाणे उत्तर येथील इंदिरानगरमधील पूरन सिंह हे एकमेकांचे नातेवाईक होते. पूरन स्वतः तांत्रिक होता. पोलिसांनी या घटनेचा खुलासा करताना सांगितले की, पूरनचा गुरू कमरुद्दीन भगतगिरी हा तांत्रिक कृती करायचा. त्याने जमिनीत दडलेल्या खजान्याचा मोह दाखवून दोघांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आणि विषारी लाडू खायला दिले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून काय सापडलं?
पोलिसांना दोघांचे मृतदेह एका लिंबाच्या झाडाखाली आढळले. घटनास्थळावरून बूंदीचे लाडू, लिंबू आणि पाण्याने भरलेला ग्लास मिळाला. याशिवाय, लिंबाच्या झाडावर सुईने टोचलेला एक पुतळाही सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आरोपी तांत्रिकाला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं.
पोलीस तपासात समोर आलं की, तांत्रिकाने दोन्ही मृत व्यक्तींकडून तंत्र-मंत्राच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली होती. काम न झाल्याने त्यांनी पैसे परत मागितले, ज्यामुळे तांत्रिकाचा राग अनावर झाला. 8 मे रोजी तांत्रिकाने दोघांना बोलावून जमिनीत दडलेल्या खजान्याचं लालच दिलं. त्यांना सांगितलं की, लिंबाच्या झाडाखाली आत्महत्या केल्यास जिन्न येईल आणि जमिनीतून खजाना काढून देईल. यासाठी त्याने दोघांना विषारी लाडू खायला दिले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मृत रामनाथ याचा भाऊ रामसिंह याने रामगढ येथील अजमेरी गेट येथील रहिवासी तांत्रिक कमरुद्दीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तांत्रिकाला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. तांत्रिकाने सांगितलं की, त्याने दोघांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आणि विषारी लाडू खायला दिले.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
