AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुण जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुण जागीच ठार
भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन बाईकस्वारांचा मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Mar 06, 2023 | 5:16 PM
Share

शहापूर / सुनील जाधव : मुंबई-नाशिक महामार्गावर खातीवलीजवळ दुपारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दोन बाईकला धडक दिल्याची घटना घडली. खातीवली येथील शुभवास्तु समोर हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही बाईकवरील दोन तरुण जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. गजानन काठोळे आणि कैलास भेरे अशी मयत दुचाकीस्वारांची नावे आहेत. उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरु केला.

कंटेनर चालकाला अटक

अपघाताची माहिती मिळताच वासिंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत वासिंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. संबंधित कंटेनर ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली असून, कंटेनर पडघा पोलीस स्थानकात जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बोलके करत आहेत.

कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकची चार वाहनांना धडक

पुण्यातील कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये बाईकची बसला धडक

वळण घेत असताना भरधाव बाईक बसला धडकल्याची घटना चंद्रपूर शहरात घडली. स्थानिक विश्रामगृहासमोर झालेल्या या अपघातात दोन बाईकस्वार गंभीर जखमी झाले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस शहराकडे वळसा घेत होती. मात्र अतिवेगात असलेल्या बाईकस्वारांचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने जखमी युवकांना मदत केली.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.