AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शॉकिंग… निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही, भाजप नेत्यांनी विष घेतलं; एकाचा मृत्यू तर दुसरा…

उत्तर प्रदेशात नगर पालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही म्हणून भाजपच्या दोन नेत्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही विष प्राशन केलं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शॉकिंग... निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही, भाजप नेत्यांनी विष घेतलं; एकाचा मृत्यू तर दुसरा...
bjp flagImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2023 | 12:16 PM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशातील महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मोठ्या राजकीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार सेटिंग सुरू आहे. यातील काही कार्यकर्ते तिकीट मिळवण्यात यशस्वी होत आहेत. तर काहींना तिकीटापासून वंचित राहावं लागत आहे. भाजपच्या दोन नेत्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आहे. या दोन्ही नेत्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर आहे. शामली आणि अमरोहा येथील हे दोन्ही नेते असून त्यांना तिकीट न मिळाल्याने प्रचंड टेन्शनमध्ये होते.

शामलीच्या कांधला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांधला नगरपालिकेच्या सभासदपदासाठी एका व्यक्तीला भाजपचं तिकीट हवं होतं. पार्टीने त्याला तिकीट नाकारलं. त्यामुळे त्याने विष घेतलं. तब्येत बिघडल्यानंतर त्याला तात्काळ मेरठच्या रुग्णालयात दाख करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दीपक सैनी असं त्याचं नाव आहे. तो भाजपचा स्थानिक नेता आहे. दीपकच्या मृत्यूमुळे या परिसरावर शोककळा पसरली आहे. त्याचे घरचे टेन्शनमध्ये असून रडून रडून त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दीपकला निवडणूक लढवायची होती. भाजप नेत्यांनी तिकीट देताना गोलमाल केला. त्यामुळे त्याला तिकीट मिळालं नाही, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

आईचे गंभीर आरोप

दीपक या जगात नाही यावर स्थानिकांचा विश्वासच बसत नाहीये. दीपक सैनी हा वॉर्ड नंबर 3 नगर पंचायत कांधलाचा यापूर्वी सदस्य होता. दीपकच्या आईने भाजपच्या कांधला नगरपंचायतीचे उमेदवार नरेश सैनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यासमोर दीपकने उभं राहू नये म्हणूनच त्याचा पत्ता कापण्यात आला. यामागे नरेश असल्याचा आरोप दीपकच्या आईने केला आहे.

ऐनवेळी पत्ता कापला

अमरोहातही अशीच घटना घडली आहे. भाजप नेते मुकेश सक्सेना यांना मोहल्ला मंडी चौब वॉर्ड नंबर 27 मधून लढायचं होतं. त्यांनी वरिष्ठ नेत्यांना तिकीट मागितलं होतं. उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव होतं असा दावा केला जात आहे. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला. मुकेश सक्सेना यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे मुकेश प्रचंड दुखावले गेले होते. या टेन्शनमध्येच त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं.

मुकेश सक्सेना हे गेल्या 12 वर्षापासून अमरोहा नगरमध्ये भाजपचे महामंत्री म्हणून काम पाहत आहेत. मोहल्ला मंडी चौब येथेच ही घटना घडली. पहिल्या टप्प्यातील नामांकनाचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रइाय आज सुरू होणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी मोटा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही टप्प्यासाठी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.