लखनऊ : दोन भाऊ रस्त्याने चालत होते. पण अचानक त्यांच्या डोक्यावर असलेली विजेची वायर तुटली. त्यानंतर मोठी दुर्घटना घडली. तुटलेली वायर ही थेट त्या मुलांच्या अंगावर पडली. यावेळी आग लागली. दोन्ही मुलांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.