AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात दोन ठार तर दोन जखमी

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे समृद्धी महामार्गावरुन जात असताना कारचा डाव्या बाजूचा टायर फुटून ती कार दुभाजकावर आदळली. भरधाव कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात दोन ठार तर दोन जखमी
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघातImage Credit source: TV9
| Updated on: Feb 17, 2023 | 8:03 PM
Share

अहमदनगर / मनोज गाडेकर (प्रतिनिधी) : भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी समृद्धी महामार्गावर घडली. कारचा टायर फुटून कार दुभाजकावर आदळली. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ही घटना घडली. मयतांमध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. दोन जखमी तरुणींवर जखमींवर कोपरगावच्या एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअरबॅग उघडूनही दोघांनी जीव गमावला. वैद्यकीय कारणासाठी नागपूरहून नाशिककडे जात असताना हा अपघात झाल. राजेश रहाटे आणि अलका वझुलकर अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

कारमधील सर्वजण नागपूरहून नशिकला चालले होते

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील राजेश राजाराम रहाटे हे आपली मुलगी लीना राजेश रहाटे, भाची अवंतिका वझुलकर आणि मेव्हणी अलका वझुलकर यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी नाशिकच्या दिशेने जात होते. चौघे जण आपल्या मारुती सुझुकी कंपनीच्या ब्रेजा कारने नाशिकला वैद्यकीय कारणासाठी चालले होते.

कारचा टायर फुटल्याने अपघात

यावेळी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे समृद्धी महामार्गावरुन जात असताना कारचा डाव्या बाजूचा टायर फुटून ती कार दुभाजकावर आदळली. भरधाव कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला. समोरील दोन्ही एअर बॅग उघडले असले तरी या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला,‌ तर दोन तरूणी जखमी झाल्या.

दोघांचा जागीच मृत्यू तर दोन तरुणी जखमी

राजेश रहाटे आणि अलका वझुलकर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर लीना रहाटे आणि अवंतिका वझुलकर या दोघी जखमी झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका आणि एमएसएफचे जवान मदतीसाठी पोहोचले. या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दोन महिन्यांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग खुला झाल्यापासून अनेक अपघात या महामार्गावर घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरगावच्या शिर्डी इंटरचेंजजवळ एक भरधाव कार संरक्षण कठड्यावर चढली होती. या अपघातात वाहनात असलेला चालक थोडक्यात बचावला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.