अवैध धंद्याची तक्रार केल्याने संताप, भररस्त्यात दोघांवर हल्ला, कुठे घडली घटना?

दोघे तरुण वाढदिवसाच्या पार्टीहून परतले अन् गप्पा मारत बसले होते. इतक्यात तिघे जण तेथे आले अन् भररस्त्यात थरारनाट्य घडले.

अवैध धंद्याची तक्रार केल्याने संताप, भररस्त्यात दोघांवर हल्ला, कुठे घडली घटना?
जुन्या वादातून दोघा तरुणांवर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 25, 2023 | 11:20 AM

अहमदनगर : तक्रार केल्याच्या रागातून दोन तरुणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. जखमीवर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे असे मयत युवकाचे तर शुभम पडोळे असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भररस्त्यात तलवारीने हल्ला

मुख्य आरोपी गणेश बोराटे आणि नंदू बोराटे यांचा सुगंधी सुपारीचा अवैध धंदा आहे. या धंद्याची तक्रार पीडित तरुणांनी केली होती. याचाच राग मनात धरुन पाच जणांनी ओंकार आणि शुभमवर हल्ला केला. वाढदिवसाच्या पार्टीहून परतत ओंकार आणि शुभम दोघेही मध्यरात्री एकच्या सुमारास बालिकाश्रम रोडवर बसले होते. यावेळी आरोपींनी तलवारीने दोघांवर वार केले. यात ओंकारचा जागीच मृत्यू झाला तर शुभम गंभीर जखमी झाला.

तिघांना नगरमधून तर दोघांना पुण्यातून अटक

सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला. वेगाने तपासचक्रे फिरवत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना नगर शहरातून अटक केली. तर दोन मुख्य आरोपींना पुणे शहरातून अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.