AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arun Gawli : चुकीला माफी नाही, अरुण गवळी दगडी चाळीत आला, BMC निवडणुकीवर काय होणार परिणाम?

Arun Gawli : 2007 सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 76 वर्षीय अरुण गवळीला जामीन मंजूर केला. अरुण गवळी हे एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव होतं. थेट दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या गुन्हेगारी टोळ्यांना गवळी भिडला.

Arun Gawli : चुकीला माफी नाही, अरुण गवळी दगडी चाळीत आला, BMC निवडणुकीवर काय होणार परिणाम?
Arun Gawli
| Updated on: Sep 05, 2025 | 2:52 PM
Share

एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी परतला. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये 18 वर्ष राहिल्यानंतर गवळी बाहेर आला आहे. गवळीची तुरुंगातून बाहेर येण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी तो पॅरोलवर अधनं-मधनं बाहेर यायचा. 2007 सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 76 वर्षीय अरुण गवळीला जामीन मंजूर केला. अरुण गवळी हे एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव होतं. थेट दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या गुन्हेगारी टोळ्यांना गवळी भिडला. अरुण गवळी, छोटा राजन, दाऊद इब्राहिम यांना आजही अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं जातं. गुन्हेगारी विश्वात त्यांचा एक दबदबा राहिला आहे. आज पूर्वीसारखं मुंबई अंडरवर्ल्ड सक्रीय नाहीय. गुन्हेगारी टोळ्यांची ताकद संपुष्टात आली आहे. मात्र भायखळा दक्षिण मुंबईच्या भागात आजही अरुण गवळीच्या नावाचा दरारा कायम आहे.

अरुण गवळीच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वेळेकडे राजकीय जाणकार लक्ष वेधत आहेत. पुढच्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याआधी अरुण गवळी बाहेर आला आहे. अरुण गवळी भायखळ्यातल्या 3.50 लाख मतदारांवर प्रभाव टाकणार का? अशी चर्चा आहे. भायखळा हा अरुण गवळीचा बालेकिल्ला मानला जातो. गवळी तुरुंगात असताना त्याची मुलगी गीता गवळीने सातत्याने या भागातून महानगर पालिकेची निवडणूक जिंकली आहे.

नेहमीच शिवसेनेला दिली साथ

अरुण गवळी स्वत: अपक्ष आमदार राहिला आहे. 2004 साली चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून त्याने अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्याआधी लोकसभा निवडणुकीत त्याने तब्बल 92 हजार मतं मिळवली होती. कमलाकर जामसांडेकर खून खटल्यात तुरुंगात गेल्यानंतर अरुण गवळीचा तसा राजकारणाशी थेट संबंध राहिला नाही. पण त्याची मुलगी त्या भागातून सतत निवडणूक जिंकत आहे. गवळीच्या अखिल भारतीय सेनेने महापालिकेत नेहमी शिवसेनेला साथ दिली.

राजकीय गणितं काय?

पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत गवळीची साथ कोणाला मिळते? याची उत्सुक्ता आहे. कारण अरुण गवळी आता या भागात सक्रीय नसला, तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात आहे. यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे. ठाकरे बंधुंच या निवडणुकीत सर्वच पणाला लागलं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दक्षिण मुंबईत अरुण गवळी महायुतीला साथ देणार की, महाविकास आघाडीला यावर अनेक राजकीय गणितं अवलंबून आहेत.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.