Video : ‘कुत्रही नाही खाणार हे असलं…’ पोलिसांचं जेवणं अत्यंत निकृष्ट्य! व्यथा मांडताना ढसाढसा रडला

सिद्धेश सावंत

|

Updated on: Aug 11, 2022 | 10:41 AM

Police Crying Video : पोलीस शिपायाचं रडणं पाहून त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली. व्हिडीओ काढण्यात सुरुवात केली.

Video : 'कुत्रही नाही खाणार हे असलं...' पोलिसांचं जेवणं अत्यंत निकृष्ट्य! व्यथा मांडताना ढसाढसा रडला
आणि पोलीस ढसाढसा रडला...
Image Credit source: TV9 Marathi

ओक्साबोक्शी रडणाऱ्या एका पोलिस हवालदाराचा व्हिडीओ (Police cry Video) समोर आला आहे. हा पोलीस हवालदार मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाविरोधात आवाज उठवताना दिसतो. जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याच्याविरोधात व्यथा मांडताना या पोलिसांना रडू कोसळलंय. वरिष्ठांना सांगूनही कुणी दखल घेत नसल्यामुळे आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न या पोलीस शिपायाला पडलाय. पोलीस लाईन मध्ये चालवल्या जाणाऱ्या मेसमध्ये पोलीस शिपायांना (Police News) भत्ता म्हणून पोषण आहार दिला जातो. जेवण दिलं जातं. पण 12 तास ड्युटी केल्यानंतर मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा किती खालावला आहे, यावर पोलीस शिपायानं बोट ठेवलंय. जेवणाऱ्या दर्जावरुन आंदोलन करणाऱ्या या पोलीस शिपायाचा व्हिडीओ सोशल मीडिया (Social Media Viral Video) व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय. ही घटना उत्तर प्रदेशातली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझं निवेदन ऐकावं, अशी आर्त हाक हा पोलीस शिपाई व्हिडीओमध्ये देताना पाहायला मिळालाय.

पाहा व्हिडीओ :

कोणंय हा पोलीस शिपाई?

मनोज कुमार असं जेवणाबाबत व्यथा मांडणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. त्यानं अनेक जेवणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. पण कुणीही त्यावर दखल घेतली नाही. वरिष्ठांना फोनवरुनही संपर्क केला, पण कुणीच ऐकून घेत नाही. उलट निलंबन करण्याची धमकी देतात, असाही आरोप मनोज कुमार यांनी केलाय. आपली व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलंय. एखाद्या लहान बाळाप्रमाणे केविलवाणी स्थिती या पोलीस शिपायाची झाली असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे जाणवतं.

पाहा व्हिडीओ :

पोलीस शिपायांना दिलं जाणारं हे जेवणं इतकं वाईट आहे, की कुत्रही त्यांना तोंड लावणार नाही, असं मनोज कुमार यांनी म्हटलंय. तसंच पोषण आहानाच्या नावाखाली घोटाळा सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलंय. वरिष्ठांनी केलेल्या या घोटाळ्यामुळे पोलीस शिपायांना त्रास सहन करावा लागतोय. जर पोटातच काही नसेल, तर आम्ही ड्युटी तरी काय करणार आहोत, असा हतबल सवाल पोलीस शिपाई मनोज कुमार यांनी विचारलाय.

दरम्यान, पोलीस शिपायाचं रडणं पाहून त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली. व्हिडीओ काढण्यात सुरुवात केली. हे पाहून स्थानिक पोलिसांनी शिपायाला पोलीस ठाण्यात चल, तिथे तुझं म्हणणं मांड, असं म्हणत त्याची समजून काढण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण आता फिरोझाबाद पोलिसांनी गंभीरपणे घेतलं असून संबंधित यंत्रणाना याप्रकरणी दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI