वर्दीवाले दरोडेखोर… गोरखपूरमध्ये पोलिसांकडून व्यापाऱ्यांची लूट

वर्दीवाले दरोडेखोर... गोरखपूरमध्ये पोलिसांकडून व्यापाऱ्यांची लूट

व्यापाऱ्यांकडे चेकिंग करण्याच्या बहाण्याने त्यांचं अपहरण करुन नौसडमध्ये 19 लाख रुपये आणि 11 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने लुटले होते.

Nupur Chilkulwar

|

Jan 23, 2021 | 2:58 PM

गोरखपूर : युपीच्या गोरखपूरमध्ये दरोड्याचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे (Gorakhpur Loot Case). येथील बस स्टेशन महाराजगंज जिल्ह्यातील दोन सराफा व्यावसायिकांची लुट करणारे आरोपी हे चक्क पोलीस निघाले. यांनी व्यापाऱ्यांकडे चेकिंग करण्याच्या बहाण्याने त्यांचं अपहरण करुन नौसडमध्ये 19 लाख रुपये आणि 11 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने लुटले होते. गोरखपूर पोलिसांनी गुरुवारी या आरोपींना अटक केली (Gorakhpur Loot Case).

बस्ती जिल्ह्याच्या पुराना बस्ती ठाण्यात तैनात एक पोलीस निरीक्षक आणि दोन शिपायांकडून पोलिसांनी लुटलेली रोकड आणि सोनं जप्त केलं आहे. एसएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात एनएसए आणि गँगस्टरची कारवाई होईल. आरोपींच्या निलंबनाबाबत अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

महाराजगंजच्या निचलौल कस्बा ते लखनौकडे जाणाऱ्या दोन सराफा व्यापारी दीपक वर्मा आणि रामू वर्मा यांना बुधवारी सकाळी वर्दीवाल्या दरोडेखोरांनी चेकिंग करण्याच्या बहाण्याने बस स्थानकात खाली उतरवलं. त्यांच्याजवळील रोकड आणि सोनं लुटून घेतलं. त्यानंतर व्यापाऱ्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. मात्र, यावेळी पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे (Gorakhpur Loot Case).

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसांना खडसावल्यानंतर पोलीस अॅक्शनमोडमध्ये आली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पहिले बोलेरोची शोध घेण्यास सुरुवात झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बोलेरोबाबत माहिती मिळाली. बोलेरोच्या नंबरवरुन ती बस्ती ठाण्यातील पोलीस निरिक्षक धर्मेंद यादव, शिपाई महेंद्र यादव आणि संतोष यादव घेऊन गेले असल्याची माहिती आहे. या माहितीनंतर गोरखपूर पोलिसांचं एक पथक बस्तीकडे रवाना झालं.

पोलीसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी पहिले बोलेरोच्या ड्रायव्हर देवेंद्र यादवला पकडलं. ड्रायव्हरने सांगितलं की, तो त्या लोकांना घेऊन गोरखपूरला गेला होता. दबिश येथे एका आरोपीला पकडायचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं. गोरखपूरच्या पोलीस पथकाने निरिक्षक धर्मेंद्र यादव आणि दोन्ही शिपायांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याकडे सख्तीने चौकशी केल्यानंतर अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, त्यांच्याकडून लुटलेला मालही जप्त करण्यात आला आहे.

Gorakhpur Loot Case

संबंधित बातम्या :

15 हजाराच्या बिलासाठी बाऊन्सरकडून फायरिंग, MMRDA चे काम बंद, बाऊन्सर ताब्यात

भीमा नदीत धडावेगळे हातपाय आणि डोकं पाहून खळबळ, इंदापूर पोलिसांकडून 2 तासात आरोपींना अटक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें