कॉपी करताना पकडलं म्हणून सातवीतल्या मुलाने जे कृत्य केलं, त्याने संपूर्ण शाळाच हादरली

Student Suicide News : आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केलीय. या सुसाईड नोटमध्ये कॉपी करताना पकडलं गेल्याचा उल्लेख मुलानं केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे.

कॉपी करताना पकडलं म्हणून सातवीतल्या मुलाने जे कृत्य केलं, त्याने संपूर्ण शाळाच हादरली
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 1:39 PM

सातवीतल्या विद्यार्थ्याला परीक्षेत कॉपी करताना परीक्षकांनी पकडलं. शिक्षकांनी त्याला मुख्याध्यपकांकडे नेलं. मुख्याध्यापकांनी मुलाला खडेबोल सुनावले. शाळेतील शिक्षक ओरडल्यानं मुलगा निराश झाला. शाळेतून तो घरी आला. घरी कुणीच नाही, हे पाहून निराश झालेल्या सातवीतल्या (Seventh Std Student Suicide) मुलाने घरच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्याच केली. या मुलाचे नातेवाईक जेव्हा घरी आले, तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत असलेला मुलाचा मृतदेह पाहून सगळ्यांना धक्काच बसला. ही घटना उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) रायबरेलीमध्ये घडलीय. या आत्महत्येप्रकरणी (Student Suicide) उत्तर प्रदेशच्या रायबरेली पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

शिक्षक जबाबदार?

आत्महत्या केलेल्या सातवीतील मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. तसं पोलिसांना या मुलाची सुसाईड नोटही आढळलीय. त्यानुसार पोलिसांनी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल केलाय. या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणीभूत त्याचे शिक्षकच होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

आईवडिलांनी शिकायला पाठवलं, पण..

धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या केलेला सातवीतील मुलगा हा आपल्या आईवडिलांपासून दूर शिक्षणासाठी रायबरेली येथे राहायला आला होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला शिक्षणासाठी आपल्या काका-काकींकडे राहायला पाठवलं होतं. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कॉपी करताना पकडल्यानं शिक्षक ओरडले म्हणून मुलानं आत्महत्या केली, हे कळल्यानंतर या मुलाच्या काका काकी आणि आई वडिलांना मोठा धक्काच बसलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेत या मुलानं आपलं आयुष्य संपवलंय. या प्रकरणी रायबरेली पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतलाय. शिवाय या मुलाचे वर्गशिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांची पोलिसांकडून चौकशी केली जातेय. सुसाईड नोट आणि शिक्षकांचे जबाब नोंदवून घेत अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. मात्र या घटनेनं संपूर्ण शिक्षक वर्ग हादरुन गेलाय.

सुसाईड नोटमध्ये काय?

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केलीय. या सुसाईड नोटमध्ये कॉपी करताना पकडलं गेल्याचा उल्लेख मुलानं केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या नातेवाईकांचं म्हणणं लक्षात घेऊन शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा नोंदवलाय.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांना शिक्षा म्हणून मारण्याबाबत शिक्षकांनी हात आखडता घेतलाय. विद्यार्थ्यांनी वागताना शिक्षकही आधीच्या तुलनेत काहीसे सौम्य वागत असल्याचा सूर सातत्याने ऐकू येतो. मात्र आता विद्यार्थ्यांनी चूक केल्यानंतर त्यांना ओरडायचं तरी कसं, असाही प्रश्न यानिमित्ताने शिक्षक वर्गाला पडलाय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.