VIDEO | न्यूयॉर्कमध्ये आगीचं तांडव 19 जण मृत्यूमुखी, 9 चिमुकल्यांचा समावेश, मृतांमध्ये बहुतांश मुस्लिम

ब्रॉन्क्समधील 19 मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता (1600 GMT) आग लागली. अग्निशामक दलाचे किमान 200 जवान आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले

VIDEO | न्यूयॉर्कमध्ये आगीचं तांडव 19 जण मृत्यूमुखी, 9 चिमुकल्यांचा समावेश, मृतांमध्ये बहुतांश मुस्लिम
अमेरिकेतील अग्नितांडवाची भीषण दृश्यं
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 7:00 AM

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील एका टोलेजंग इमारतीला लागलेल्या आगीत किमान 19 रहिवाशांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मृतांमध्ये नऊ मुलांचा समावेश आहे असून बहुतांश व्यक्ती मुस्लिम समाजातील असल्याची माहिती आहे. याशिवाय 63 रहिवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत अलिकडच्या काळात झालेल्या अग्नितांडवापैकी ही भीषण आग असल्याचं बोललं जातं.

आग भडकलेली असताना रहिवाशी खिडक्यांमधून मदतीसाठी ओरडत असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. न्यूयॉर्क शहराच्या अग्निशमन दल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार पोर्टेबल इलेक्ट्रिक हीटरमुळे ही आग भडकल्याचा अंदाज आहे. जवळपास प्रत्येक मजल्यावर नागरिक अडकले होते.

चिमुरड्यांचा मदतीसाठी टाहो

“बरीच मुलं जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होती’” असं 38 वर्षीय डिलेनी रॉड्रिग्ज यांनी ‘एएफपी’ला सांगितलं. त्या आपल्या मुलांसह सुखरुप बाहेर पडल्या. महापौर एरिक अॅडम्स यांनी पत्रकारांना सांगितले की, 19 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 63 जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

पीडितांमध्ये स्थलांतरितांची संख्या अधिक

ब्रॉन्क्समधील 19 मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता (1600 GMT) आग लागली. अग्निशामक दलाचे किमान 200 जवान आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. ही मुख्यतः कामगार वर्गांची वसाहत असून इथे मोठ्या संख्येने स्थलांतरित राहतात. इमारतीतील अनेक रहिवासी मुस्लिम समाजातील होते, जे गांबियातून न्यूयॉर्कला आल्याचं महापौरांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोरच होमगार्ड तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरात उपचार

या बातम्या खोट्या, आदित्य ठाकरेंनी त्या चर्चा फेटाळल्या; शिवसेनेत कुणाला तिकीट मिळत हेही सांगितलं

Happy Birthday Kalki Kochlin : वयाच्या 27 व्या वर्षी लग्न, दोन वर्षांत घटस्फोट; कल्कीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?