Aaditya Thackeray : या बातम्या खोट्या, आदित्य ठाकरेंनी त्या चर्चा फेटाळल्या; शिवसेनेत कुणाला तिकीट मिळत हेही सांगितलं

आदित्य ठाकरेंनी या ट्विटमधून गेल्या दोन तीन दिवसांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेबद्दल (Shivsena) सुरु असणाऱ्या चर्चा फेटाळल्या आहेत.

Aaditya Thackeray : या बातम्या खोट्या, आदित्य ठाकरेंनी त्या चर्चा फेटाळल्या; शिवसेनेत कुणाला तिकीट मिळत हेही सांगितलं
आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल एक ट्विट केलंय. आदित्य ठाकरेंनी या ट्विटमधून गेल्या दोन तीन दिवसांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेबद्दल (Shivsena) सुरु असणाऱ्या चर्चा फेटाळल्या आहेत. शिवसेना आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांमुळं तर्क वितर्क सुरु झाले होते. अखेर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन त्या चर्चा फेटाळल्या आहेत.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांविषयी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले 2-3 दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

आदित्य ठाकरे यांचं ट्विट

शिवसेनेत कुणाला तिकीट मिळतं हेही सांगितलं

आदित्य ठाकरे यांनी तिकीट वाटपाबाबत माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चा फेटाळल्या. मात्र, त्यावेळी त्यांनी शिवसेना कुणाला उमेदवारी देते त्यांनी सांगितली. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांचं तिकीट मिळतं. जे जनेतच्या सेवेसाठी अहोरात्र झटतात त्यांना इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं, असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

त्या चर्चा नेमक्या कोणत्या?

आगामी काळात मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या काही नगरसेवकांऐवजी 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवसेनेत तरुण रक्ताला वाव देण्याबाबत विचार सुरु असल्याचा चर्चा सुरु होत्या. विविध माध्यमांनी यासंदर्भात बातम्या दिल्या होत्या. अखेर आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील ट्विट करुन त्या चर्चांमधील हवा काढली आहे.

इतर बातम्या:

Mumbai-Thane Election| शिवसेनेत परिवर्तनाचे वारे; अर्ध्या नगरसेवकांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार?

Breaking | आदित्यने माझा ताण पूर्णपणे कमी केलाय, मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक

Aaditya Thackeray said all news about Shivsena Election candidate rules were fake

Published On - 6:39 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI