Happy Birthday Kalki Kochlin : वयाच्या 27 व्या वर्षी लग्न, दोन वर्षांत घटस्फोट; कल्कीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून कल्की कोचलिनकडे पाहिले जाते. आज तिचा 37 वा वाढदिवस आहे. कल्की ही अभिनेत्री सोबतच एक उत्तम लेखिका देखील आहे.

Happy Birthday Kalki Kochlin : वयाच्या 27 व्या वर्षी लग्न, दोन वर्षांत घटस्फोट; कल्कीबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Happy Birthday Kalki Kochlin : आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून कल्की कोचलिनकडे पाहिले जाते. आज तिचा 37 वा वाढदिवस आहे. कल्की ही अभिनेत्री सोबतच एक उत्तम लेखिका देखील आहे. तिचा जन्म दहा जानेवारी 1984 मध्ये झाला. कल्कीचे वडील हे फ्रेच होते तर आई भारतीय. तिचे वडील हे मोठे उद्योजक होते, तर तिचे आजोबा एक नावाजलेले अभियंता होतो. कल्कीच्या जीवनात अनेक चढा-उतार आले, मात्र तिने हार न मानता आपला प्रवास सुरूच ठेवला असून, आपल्या अभिनयाच्या जोरावर तीने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

‘देवडी’साठी फिल्मफेअर पुरस्कार

कल्कीची ‘देवडी’ चित्रपटामधील भूमिका चांगलीच गाजली. या चिटपटासाठी तिला बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉड देखील मिळाला. तिने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘शैतान’, ‘माय फ्रेंड पिंटो’, ‘शंघाई’, ‘एक थी डायन’ सह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तिचे करिअरसोबतच वैयक्तीक जीवन देखील संघर्षपूर्ण राहिले आहे. तीने 30 एप्रिल 2011 मध्ये देवडी चित्रपटाचा डायरेक्टर अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते.

दोन वर्षांमध्ये घटस्फोट

अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन हे देवडी चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यादरम्यान जवळ आले. त्यांच्यामध्ये मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर कल्कीने अनुरागसोबत लग्न केले. मात्र हे लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही. अवघ्या दोनच वर्षांमध्ये तिचा घटस्फोट झाला. ते अनुराग याचे दुसरे तर कल्कीचे पहिले लग्न होते. यावर बोलताना कल्कीने तेव्हा म्हटले होते, की आम्ही घटस्फोट घेत नाही आहोत, मात्र आम्ही काही कारणांमुळे एकोंएकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कल्की ही मीडियाला देत असलेल्या बिनधास्त प्रतिक्रियांसाठी देखील ओळखली जाते.

संबंधित बातम्या

कटप्पाला कोरोनाची लागण; सत्यराज उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Disha Patani | दिशा पटानीच्या Hot lookवर टायगर श्रॉफ घायाळ, चाहत्यांची टायगरच्या कमेंटवर फिरकी

Vidya Balan | मंजुलिका पुन्हा येणार, भुलभुलैया 2 मध्ये विद्या बालन साकारणार भूमिका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI