Vidya Balan | मंजुलिका पुन्हा येणार, भुलभुलैया 2 मध्ये विद्या बालन साकारणार भूमिका

अभिनेत्री विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. या चित्रपटातील काही पात्र तर सदाबहार आहेत. 2007 साली प्रदर्शित झालेल्या भुलभलैया या चित्रपटात विद्या बालनने (Vidya Balan) साकार मंजुलीकाचे पात्रदेखील यापैकीच एक आहे. या चित्रपटामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली.

Vidya Balan | मंजुलिका पुन्हा येणार, भुलभुलैया 2 मध्ये विद्या बालन साकारणार भूमिका
BHULBHULAIYA AND VIDYA BALAN

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. या चित्रपटातील काही पात्र तर सदाबहार आहेत. 2007 साली प्रदर्शित झालेल्या भुलभलैया या चित्रपटात विद्या बालनने (Vidya Balan) साकारलेले मंजुलीकाचे पात्रदेखील यापैकीच एक आहे. या चित्रपटामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. दरम्यान, भुलभुलैया 2 (bhul bhulaiya) या चित्रपटातदेखील मंजुलिकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा विद्या बालनच दिसणार आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भुलभुलैया 2 मध्ये विद्या बालन साकारणार मंजुलिका

द मी डेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. भुलभुलैया 2 या आगामी चित्रपटामधील मंजुलिका या पात्राबद्दल अनीस बज्मी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटातील मंजुलिकी हे पात्र माझे आवडते आहे. जिथे भुलभुलैया आहे तिथे निश्चितच विद्या बालन असेल. विद्या बालन भुलभुलैया 2 या चित्रपटातदेखील दिसेल, असं अनीस बज्मी यांनी म्हटलं आहे. 2011 साली अनीस बज्मी यांचा थँक यू हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटादेखील विद्या बालन यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटातही विद्या मंजुलिका हे पात्र साकारताना दिसली होती. त्यानंतर आता भुलभुलैया 2 मध्ये विद्या आणखी एकदा आपली अभिनय सादर करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

डर्टी पिक्चरमधील सिल्क स्मिता पात्र ठरले अजरामर

विद्या यांनी परिणीता या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा एक रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी संजय दत्त आणि सैफ अली खानसारख्या बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर विद्या बालनच्या करिअरचा ग्राफ चढाच राहिला. डर्टी पिक्चरमध्ये विद्याने साकारलेले सिल्क स्मिता हे पात्र तर चित्रपट रसिकांना चांगलेच आवडले होते. या चित्रपटातील भूमिकेमुळे विद्या बालनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विद्या बालन यापूर्वी शेरनी या चित्रपटात झळकली होती.

दरम्यान, भुलभुलैया 2 या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या चित्रपटात अक्षय कुमारच्या ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर कार्तिकसोबत कियारा आडवाणी आणि तब्बू यांच्याही अभिनयाची कमाल पाहायला मिळणार आहे. भुलभुलैया 1 या चित्रपटात परेश रावल तसेच अमीषा पटेल, राजपाल यादव या दिग्गजांनी अभिनय केला होता.

इतर बातम्या :

Majha Hoshil Na | ‘माझा होशील ना’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ? अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कोणत्या महिन्यात येणार ? महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची माहिती

Lal Singh Chaddha | हॉलिवूडचा अभिनेता Tom Hanks साठी ‘लाल सिंग चड्ढा’चे अमेरिकेत स्पेशल स्क्रीनिंग, चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार ?


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI