Lal Singh Chaddha | हॉलिवूडचा अभिनेता Tom Hanks साठी ‘लाल सिंग चड्ढा’चे अमेरिकेत स्पेशल स्क्रीनिंग, चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार ?

आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित असा लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chaddha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून आमिर या चित्रपटावर काम करतोय. हा चित्रपट येत्या 14 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

Lal Singh Chaddha | हॉलिवूडचा अभिनेता Tom Hanks साठी 'लाल सिंग चड्ढा'चे अमेरिकेत स्पेशल स्क्रीनिंग, चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार ?
TOM HANKS AND AAMIR KHAN
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 9:33 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित असा लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chaddha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून आमिर या चित्रपटावर काम करतोय. हा चित्रपट येत्या 14 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, प्रदर्शनापूर्वी आमिर खान या चिपत्रटाचे अमेरिकामध्ये स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्याच्या विचारात आहे. हॉलिवूडचा जगप्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्ससाठी (Tom Hanks) हे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले जाणार आहे.

टॉम हँक्ससाठी स्पेशल स्क्रीनिंग 

याबाबतचे सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. त्यानुसार आमिर खान अमेरिकेचा दिग्गज अभिनेत टॉम हँक्ससाठी लाल सिंग चड्ढा या आपल्या आगामी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवू शकतो. त्यासाठी आमिरचे प्रयत्न सुरु आहेत. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट टॉम अभिनित फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे, असे म्हटले जातेय. याच कारणामुळे टॉमने हा चित्रपट पाहून त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी अशी आमिरची इच्छा आहे.

कित्येक वर्षांपासू सुरु आहे लाल सिंग चड्ढावर काम

आमिर खान लाल सिंग चड्ढा या चत्रपटावर मागील कित्येक वर्षांपासून काम करत आहे. या चित्रपटातील पात्र टॉम्स हँक्स यांनी अभिनय केलेल्या फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटातील पात्रापासून प्रेरित आहे. भारत देशात वेगवेगळ्या दशकात वेगवेगळ्या घटना घडत असताना या पात्राला वेगवेगळ्या दशकात दाखवण्यात आलेले आहे. याच कारणामुळे मागील अनेक वर्षांपासून आमिर या चित्रपटावर मेहनत घेतोय. विशेष म्हणजे दंगल या चित्रपटानंतर आमिर कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट आमिरच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. तसेच आमिरच्या या मेहनतीमुळे या चित्रपटात काहीतरी विशेष असणार आहे, असे म्हटले जात आहे.

फॉरेस्ट गंपसाठी टॉम हँक्स यांना मिळाला होता ऑस्कर

आमिरचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा रिमेक आहे. फॉरेस्ट गंप या हॉलिवूडच्या सिनेमाला पूर्ण जगाने डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका असणारे टॉम हँक्स यांना त्यांच्या अभिनयामुळे ऑस्करदेखील मिळाला होता. तर याच चित्रपटाचा रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटामध्ये आमीर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच त्याच्यासोबत करिना कपूर खान तसेच साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. कोरोना संसर्गामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक समोर येतोय. त्यामुळे या एप्रिलमध्ये लाल सिंग चड्ढा रिलीज होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Happy Birthday Farah Khan | कोणतेही प्रशिक्षण नाही, तरीही 5 फिल्मफेअर अवॉर्ड, जाणून घ्या कोरिओग्राफर फराह खान यांचं कर्तृत्व

India’s Best Dancer 2 Finale : इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा आज अल्टिमेट फिनाले; मिका सिंग, शिल्पा शेट्टी, धर्मेश खास पाहुणे, रंगत चढणार

Happy Birthday Farhan Akhtar | लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनी घेतला घटस्फोट, आत पुन्हा बोहल्यावर चढणार फरहान अख्तर!

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.