Happy Birthday Farhan Akhtar | लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनी घेतला घटस्फोट, आत पुन्हा बोहल्यावर चढणार फरहान अख्तर!

बॉलिवूड अभिनेता, लेखक, गायक आणि निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी झाला. यावर्षी फरहान त्याचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहान अख्तरने आपल्या कारकिर्दीत चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे आणि तो यशस्वीही झाला आहे.

Happy Birthday Farhan Akhtar | लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनी घेतला घटस्फोट, आत पुन्हा बोहल्यावर चढणार फरहान अख्तर!
Farhan Akhtar

मुंबई : बॉलिवूड अभिनेता, लेखक, गायक आणि निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी झाला. यावर्षी फरहान त्याचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहान अख्तरने आपल्या कारकिर्दीत चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा फरहानचे वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत असते. फरहानच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…

फरहान अख्तर हा जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2001 मध्ये ‘दिल चाहता है’ या पहिल्या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर फरहान अख्तरने अनेक चित्रपट केले आणि त्याचा दिग्दर्शनाचा प्रवास हिट ठरला.

लग्नाच्या 17 वर्षांनी घेतला घटस्फोट

फरहानला केवळ दिग्दर्शक म्हणून ठसा उमटवायचा नव्हता. लेखन, गायन आणि अभिनयातही त्यांनी हात आजमावला. फरहान या सर्व क्षेत्रातही हिट ठरला आहे. फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केले होते. फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले आणि दोघांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना यांच्यात घटस्फोटाचे कारण फरहानचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले जात होते.

शिबानी दांडेकरसोबत बांधणार लग्नगाठ

मात्र, दोघेही याबाबत कधीही उघडपणे बोलले नाहीत. पण घटस्फोटाच्या वेळी फरहानचे अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत अफेअर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या आणि अधुनामध्ये अंतर आले आणि दोघांचा घटस्फोट झाला. सध्या फरहान मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. त्याचबरोबर या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही येत असतात, मात्र दोघांनीही याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान!

फरहान अख्तरच्या प्रमुख चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याने ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘डॉन’, ‘डॉन 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये लेखनाचे काम केले आहे. याशिवाय त्याने ‘डॉन’, ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करत दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर फरहानने ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘मिल्खा सिंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.

हेही वाचा :

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ शुक्रवारी चित्रपटगृहांत! पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलरने वाढवली उत्सुकता…

ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?

संकेत पाठकचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन, ‘लग्नाची बेडी’ मालिकेत साकारणार धडाकेबाज पोलिस ऑफिसर!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI