Majha Hoshil Na | ‘माझा होशील ना’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ? अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण

मालिकेसंदर्भात गौतमी देशपांडे काहीतरी महत्त्वाची माहिती देणार आहे. तिने प्रेक्षकांनी ही माहिती काय असू शकते ? याचा अंदाज लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच माझा होशील ना या मालिकेविषयी काहीतरी सांगणार असल्याचं तिने म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर तीने याबाबत पोस्ट केलीय.

Majha Hoshil Na | 'माझा होशील ना' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ? अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण
GAUTAMI DESHPANDE AND MAJHA HOSHIL NA (फोटो- इन्स्टाग्राम- @marathiserials_official)

मुंबई : मोठ्या पडद्यावरील अभिनेत्यांचे जसे चाहते असतात. अकदी तसाच चाहता वर्ग छोड्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचा असतो. महाराष्ट्रात मालिका, रिअॅलिटी शो अशा मनोरंजनपर कार्यक्रमांना तर मोठ्या आवडीने पाहिले जाते. छोड्या पद्यावरील देवमाणूस, तुला पाहते रे, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई या मालिकांनी तर पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला. माझा होशील ना या मराठी मालिकेनेही असाच तिचा काळ गाजवला. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी या कलाकारांना या मालिकेने महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. याच मालिकेसंदर्भात गौतमी देशपांडे काहीतरी महत्त्वाची माहिती देणार आहे.  माझा होशील ना या मालिकेविषयी काहीतरी सांगणार असल्याचं तिने म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर तीने याबाबत पोस्ट केलीय. तसेच तिने प्रेक्षकांनी ही माहिती काय असू शकते ? याचा अंदाज लावण्याचे आवाहन केले आहे.

गौतमीने पोस्ट केली, अन् चर्चेला उधाण 

गौतमी देशपांडे या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. “माझा होशील ना या मालिकेबद्दल मला तुम्हाला काही सांगायचे आहे. मला नेमकं काय सांगायचे आहे, याचा तुम्हाला अंदाज लावता येईल का. ही माहिती माझा होशील ना पर्व 2 विषयी असेल का ?” असं ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

लवकर माझा होशील ना चे दुसरे सिझन आणा 

गौतमीच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. माझा होशील ना या मालिकेचे प्रेक्षक तसेच तिच्या चाहत्यांनी गौतमीच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. माझा होशील ना चे दुसरे सिझन लवकर आणा, अशी विनंती एका चाहत्याने केली आहे. तर माझा होशील ना या मालिकेला तीन वर्ष पूर्ण झाले असतील म्हणून गौतमीने ही पोस्ट केली असावी, असा अंदाज दुसऱ्या एका चाहत्याने लावला आहे.दरम्यान गौतमी नेमकं कोणतं गुपीत खोलणार याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. असे असले तरी माझा होशील ना या मालिकेबाबत काहीतरी खुशखबर असावी असा अंदाज लावला जात आहे.

इतर बातम्या :

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कोणत्या महिन्यात येणार ? महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची माहिती

Vicky Kaushal | विकी कौशलवर ही वेळ आली ? म्हणतो कृपया मला चित्रपटात घ्या, इन्स्टाग्राम पोस्टची एकच चर्चा

Lal Singh Chaddha | हॉलिवूडचा अभिनेता Tom Hanks साठी ‘लाल सिंग चड्ढा’चे अमेरिकेत स्पेशल स्क्रीनिंग, चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार ?


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI