Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू बोलली, ‘मी तुझ्या मुलाची…’, ते ऐकताच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल

एकमेकाला समजून गोडी गुलाबीने संसार करायचा असतो. पण काही व्यक्ती याला अपवाद असतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यात संशयाच भूत असतं. यातून संसार बहरण्याऐवजी उलट नातं तुटायला सुरुवात होतं.

लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू बोलली, 'मी तुझ्या मुलाची...', ते ऐकताच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल
Marriage Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 11:15 AM

पती-पत्नीचा नातं विश्वासाच असतं. हाच या नात्याचा आधार-पाया असतो. तुमचं लग्न होतं, तेव्हा बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतात. एकमेकाला समजून गोडी गुलाबीने संसार करायचा असतो. पण काही व्यक्ती याला अपवाद असतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यात संशयाच भूत असतं. यातून संसार बहरण्याऐवजी उलट नातं तुटायला सुरुवात होतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने असं सत्य सांगितलं की, नवरदेवाने तिची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी नवरदेव आणि त्याच्या आईला अटक केली आहे. या प्रकरणात अन्य पाच आरोपी फरार आहेत. अटकेनंतर पतीने जो खुलासा केला, त्याने पोलीसही हैराण झालेत.

उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील हे प्रकरण आहे. अलापुर गावात राहणाऱ्या यादरामच्या मुलाचा नीरजचा शाहजहांपुरच्या रामनिवास यांच्या मुलीशी 22 जानेवारीला लग्न झालं. ज्या मुलीसोबत लग्न झालं, तिच्यासोबत नीरजचे आधीपासून प्रेमसंबंध होते. नात्यात असल्याने दोघांच लग्न लावण्यात आलं. दोघांमध्ये लग्नाआधीपासून शारीरिक संबंध होते. पण मुलीने ती गर्भवती असल्याच आधी सांगितलं नव्हतं.

‘लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली’

नीरजने पोलिसांना सांगितलं की, “लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने मला सांगितलं की, ती अडीच महिन्याची गर्भवती आहे, तेव्हा मला धक्का बसला. मला विश्वासच बसला नाही. मी घरच्यांना या बद्दल सांगितलं. कुटुंबिय आणि आसपासच्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. बरच काही माझ्याबद्दल बोललं जात होतं. ते मला सहन झालं नाही. त्यानंतर मी आईच्या साथीने पत्नीची गळा आवळून हत्या केली”

मुलीच्या वडिलांच म्हणणं काय?

रामनिवासने मुलीच्या मृत्यूनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून नवरा, सासू कांता, सासरा यादराम, दीर रवी, नणंद अंजू, काका लालाराम आणि दिनेश यांनी, माझ्या मुलीची गळा आवळून हत्या केली असा मुलीच्या पित्याचा आरोप आहे. पोलिसांनी पती आणि सासू कांता यांना अटक केली आहे. पाच आरोपी अजून फरार आहेत.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.