फावड्याने गळा कापला, जागीच ठार! पण हत्येनंतरही तो थांबला नाही, पुढची 10 मिनिटं त्याने…

गळ्यावर फावड्याने वार केला, तिचा जागीच जीव गेला. पण त्यानंतही तो थांबला नाही. पुढची 10 मिनिटं त्याने जे केलं, ते क्रूरतेचा कळस गाठणारं होतं!

फावड्याने गळा कापला, जागीच ठार! पण हत्येनंतरही तो थांबला नाही, पुढची 10 मिनिटं त्याने...
हत्यांकांड झालेलं ठिकाणImage Credit source: tv9 network
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 3:07 PM

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या (Husband killed wife) केली. फावड्याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर वार केला. पत्नी झोपेत असताना पतीने फावड्याने गळा चिरला. पत्नीने केलेला वार इतका जबर होता की पत्नीचा जागीच जीव गेला. पण यानंतरही माथेफिरु पती थांबला नाही. तिचा जीव गेल्यानंतरही पुढची 10 मिनिटं तो आपल्या पत्नीवर सपासप वार करत राहिला होता, अशी माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात घडली. या हत्याप्रकरणी पोलिसांनी (UP crime News) आरोपी पतीसह हत्येसासाठी (Murder) वापरलेला फावडाही ताब्यात घेतलाय.

बाराबंकी जिल्ह्यातील सतरीख पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. जैनाबाद मजरे बबुरिहा या गावात हे हत्याकांड घडल्याचं उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडालं होतं. या गावात अजय कुमार आणि वर्षा हे दाम्पत्य राहत होते. 15 वर्ष त्यांनी एकमेकांसोबत संसार केला. त्यांना चार मुलं आहेत. पण संसारांत नवरा बायकोचा संवाद कमी आणि वादच जास्त होत होते, अशी माहिती आता उघडकीस आलीय.

छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्या नेमकी खटके उडायचे. अजय वर्षाला छोट्या मोठ्या कारणावरुन सारखा छळायचा. कधी कधी मारपीटही करायचा. वर्षाने आपल्या माहेरी याबाबत सांगितलं होतं. पण माहेरच्यांनी संसारात सांभाळून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हाच जर माहेरच्या लोकांनी वर्षाची तक्रार गांभीर्याने घेतली असती, तर आज ती जिवंत असती, अशी भावना आता तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडमोडी : Video

एक दिवस नेहमीप्रमाणे वर्षा घरात झोपली होती. इतक्यात अजय आला. त्याच्याशी थोडीशी शाब्दिक चमक उडाली. किरकोळ भांडणाचा राग अजय कुमारच्या डोक्यात गेला. त्याने थेट फावडा उचलला आणि झोपलेल्या अवस्थेत असलेल्या वर्षाच्या गळ्यावर जोरदार प्रहार केला. हा प्रहार इतका जबर होता की वर्षाचा जागीच जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे वर्षाची हत्या केल्यानंतरही अजय पुढची 10 मिनिटं तिच्या गळ्यावर फावड्यानं वार करतच राहिला होता. यावरुन त्याच्या डोक्यात किती राग भरला होता, याची निव्वळ कप्लना केलेली बरी.

दरम्यान, गावातील लोकांना ही बाब कळली. त्यांनी तातडीने अजय कुमारचं घर गाठलं. संतप्त झालेल्या जमावाने अजयला पकडून चोप दिला. नंतर त्याचा पोलिसांच्या हवाले केलं. पत्नीची हत्या करुन दुसरा कुणातरी पळून गेला असता. पण अजय इतका माथेफिरु होता, की मेल्यानंतरही पत्नीच्या मृतदेहावर वार करत राहिला होता.

पोलिसांनी हत्याकांडाच्या या घटनेची गंभीर दखल घेतलीय. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती अजय कुमार याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून घेतलाय. त्याला अटकही करण्यात आलीय. सध्या पुढील तपास केला जातो. संपूर्ण गाव या घटनेनं हादरुन गेलंय.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.