AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक गाडी येईल, त्यात बसून तुला..1 तासाचे 80 लाख..सख्ख्या काकीनेच भाचीला दिली धक्कादायक ऑफर

ज्या माणसांना आपण जवळच मानतो, ती माणसं तोंडावर गोड बोलतात. पण त्यांच्या मनात दुसरच काही चाललेल असतं. त्यांना नात्यांचा, मर्यादेचा विसर पडतो. अशीच एक नात्यावरचा विश्वास उडावा अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.

एक गाडी येईल, त्यात बसून तुला..1 तासाचे 80 लाख..सख्ख्या काकीनेच भाचीला दिली धक्कादायक ऑफर
Representative Image
| Updated on: Jul 06, 2026 | 1:18 PM
Share

कधी कधी आपलीच माणसं घात करतात. त्यांना नात्यांचा विसर पडतो. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्याच्या दुल्लहपूर क्षेत्रात घडली आहे. एका सख्ख्या काकीनेच काही रुपयांसाठी आपल्या भाचीच्या आत्मसम्मानाचा सौदा करण्याचा प्रयत्न केला. काकीने आणि गावातील एका युवकाने मिळून युवतीला 1 तासाच्या कामासाठी 20 लाख रुपयांचं आमीष दाखवलं. इतकी मोठी रक्कम ऑफर करण्यामागचा इरादा जेव्हा युवतीला समजला, तेव्हा तिने हा प्रस्ताव धुडकावून लावला. युवतीने फक्त प्रस्तावच धुडकावला नाही, तर तिने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच तत्परता दाखवता काकी आणि तिच्यासोबत असलेल्या युवकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. दुल्लहपूर पोलीस ठाणे क्षेत्रातंर्गत येणार एक गाव आहे. पीडित युवतीची मागच्या काही दिवसांपासून सख्खी काकी आणि गावातील एक युवक दिशाभूल करत होते. आरोपींनी युवतीला आमिष दाखवलं की, एका कामासाठी 80 लाख रुपये मिळतील. त्यातले 20 लाख थेट तुला आणि उर्वरित रक्कम काकी आणि तिच्या साथीदारामध्ये वाटली जाईल.

युवतीने होकार द्यावा यासाठी काकी आणि तिचा साथीदार तिच्या मागे लागलेले. तिच्यावर दबाव टाकत होते. या संदर्भात कुटुंबातील कुठल्याही अन्य सदस्याला काही समजता कामा नये, असा इशाराही दिलेला. युवतीला काकी देत असलेल्या ऑफरवर संशय आला. काकीला तिने खोदून, खोदून विचारलं, त्यावेळी या धक्कादायक कटाचा पर्दाफाश झाला. काकीने सांगितलं की, तुझ्यासाठी एक गाडी येईल. त्यात बसून तुला शेजारच्या आजमगढमध्ये जायचं आहे. तिथे फक्त एक तास थांबून परत यावं लागेल.

युवतीच्या पायाखालची जमीन सरकली

एक तासात असं कुठलं काम करावं लागेल, त्यासाठी कोणी 20 लाख रुपये देणार आहे. त्यावर युवतीला काकी पुष्पा देवीने आपली घाणेरडी योजना सांगितली. एक तासासाठी या मुलीला काही अश्लील गोष्टी कराव्या लागणार होत्या. काकीच्या तोंडून अश्लील गोष्टी ऐकून युवतीच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या आत्मसन्मान हा धक्का लावण्याचा प्रयत्न आहे. म्हणून युवतीने लगेच नकार दिला. घरी येऊन तिने आई-वडिल आणि नातेवाईकांना काकीच्या या घाणेरड्या प्लानबद्दल सांगितलं. त्यानंतर युवतीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

Follow Us