AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच 100 नवीन वाहनं येतील. त्यासाठी अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी देण्यात आला आहे. प्रणव अदाणी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांनी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी Image Credit source: मुंबई पोलिसांकडून
| Updated on: Aug 25, 2026 | 7:26 PM
Share

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच 100 नवीन वाहन दाखल होतील. त्यासाठी अदाणी फाऊंडेशनने 15 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अदाणी एंटरप्राजेजचे संचालक प्रणव अदाणी यांनी सोमवारी ही घोषणा केली. मुंबई पोलिसांची क्षमता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक चोख आणि मजबूत करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याविषयीची माहिती दिली. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अनेक अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस एक करतात. त्यांच्यासाठी हे योगदान दिल्याचे ते म्हणाले.

पोलिसांना सॅल्यूट

प्रणव अदाणी यांनी पोलिसांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. खाकी वर्दीतील धाडसी महिला आणि पुरूषांना सॅल्यूट, सलाम करतो. हे कर्मचारी मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी 24 तास काम करतात. मुंबई पोलिसांच्या वाहन ताफा अधिक मजबूत करण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाली ही आमचे सौभाग्य आहे, असे अदाणी म्हणाले. मुंबई पोलीस फाऊंडेशनने अदाणी फाऊंडेशनच्या या मदतीचे कौतुक केले आहे. या सहकार्यामुळे केवळ मुंबई पोलिसांनाच फायदा होईल असे नाही तर मुंबई आणि येथील नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था मजबूत होईल.

मुंबई पोलीस फाऊंडेशननुसार ही मदत देण्याच्या निमित्ताने प्रणव अदाणी हे मुंबई पोलिस मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांनी पोलिस दलासाठी आवश्यक गरज आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. अदाणी म्हणाले की खारीचा वाटा उचलून त्यांची छाती गर्वाने फुलून गेली आहे. कधीच न झोपणाऱ्या मुंबईसाठी पोलीस रात्र न दिवस जागी असते. त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन समुद्र मंथन योजनेचे स्वागत केले आहे. ही योजना भारताची अफाट सागरी ऊर्जा क्षमता विकसीत करण्यासाठी महत्त्वाची ठरेल असे ते म्हणाले. तर देशातंर्गत तेल आणि वायू शोधकार्याला गती देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे ते म्हणाले.

Follow Us