Nikki Murder Case Update : निक्कीच्या बेडरुममध्ये बिछाना…पती-पत्नीच्या प्रायवेट लाईफबद्दल नवीन धक्कादायक खुलासा
Nikki Murder Case Update : वहिनी बोलली की, "त्यांनी मला माहेरी आणून सोडलं. पण आता पुन्हा घेऊन जात नाहीयत. निक्कीचे कुटुंबीयच हुंड्याचे लोभी आहेत" "आता स्वत:च्या मुलीवर आलं, तेव्हा त्यांना खेद होतोय. पण दुसऱ्याच्या मुलीला त्यांनी कसा त्रास दिला, याचा त्यांना अजिबात पश्चाताप नाहीय" असे आरोप निक्कीच्या वहिनीने केले.

यूपी ग्रेटर नोएडामधील निक्की हत्याकांड प्रकरणात विपिन भाटीसह चार आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कठोडीत पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे सुरु आहेत. आता अशी माहिती समोर आलीय की, त्यावरुन पती-पत्नीच्या नात्यात सर्वकाही सुरळीत नसल्याच दिसून आलय. पोलिसांनी निक्कीच्या घराची तपासणी करताना ते तिच्या बेडरुममध्ये गेले. त्यावेळी पोलिसांनी पाहिलं की, एक बिछाना जमिनीवर अंथरलेला होता. यावरुन अंदाज लावला जातोय की, पती-पत्नी एकत्र झोपत नव्हते.
विपिन निक्कीसोबत भांडण करायचा हा संशय यामुळे अधिक बळावला आहे. विपिन भाटीच्या घरात आठ सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले होते. पण घटनेच्या दिवशी एकही कॅमेरा चालू नव्हता. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे हे कॅमेरे बंद होते किंवा काही खास उद्देशासाठी हे कॅमेरे खराब किंवा बंद करण्यात आलेले. हे कॅमेरे चालू असते, तर तथ्य पुराव्यांसह समोर आलं असतं. पोलीस याचा शोध घेतायत की, हे कॅमेरे बंद कोणी केले होते. पोलीस चौकशीत समोर आलय की, विपिनच्या घरी एकूण आठ कॅमेरे लागलेले होते. यात चार बाहेर आणि चार घराच्या आत होते. पण घटनेच्यावेळी सर्व कॅमेरे बंद होते. पोलीस इंटरनेटवर प्रक्षेपित झालेल्या व्हिडिओची दखल घेऊनही तपास करत आहेत. पोलिसांनी अन्य सीसीटीव्ह फुटेजवरुन गोळा केलेले पुरावे सुद्धा महत्त्वाचे ठरु शकतात.
निक्कीची स्वत:ची वहिनी तिच्या विरोधात
निक्कीचे कुटुंबीय सतत तिला जाळून मारल्याचा आरोप करत आहेत. विपिनचे कुटुंबीय, स्थानिक गावातले ही आत्महत्या असल्याचं सांगत आहेत. निक्कीची वहिनी सुद्धा विपिनच्या बाजूने बोलत आहे. वहिनीने सांगितलं की, “विपिन दारु प्यायचा हे खरं आहे. पण तो निक्कीवर प्रेम सुद्धा तितकच करायचा. त्याने निक्कीला मारहाण जरुर केली असेल, पण तो तिला मारु शकत नाही. त्याने तर निक्कीच्या नावा टॅटू सुद्धा गोंदवलेला” उलट वहिनीने निक्कीच्या कुटुंबाची पोल-खोल केली. “माझं लग्न निक्कीचा भाऊ रोहितशी झालं होतं. आम्ही भरपूर हुंडा दिला. पण त्यानंतरही मला फक्त रोहितच नाही, तर सासू-सासरे आणि दोघी बहिणी निक्की-कंचन त्रास द्यायच्या” असा आरोप निक्कीच्या वहिनीने केला.
